शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

टोळीने केला लग्नाचा ‘खेळखंडोबा’

By admin | Updated: March 30, 2016 03:02 IST

मुली शोधता शोधता वय निघून जात असताना अचानक एखाद्या सुस्वरूप तरुणीने आयुष्याची जोडीदार बनण्यास होकार द्यावा, ....

नरेश डोंगरे नागपूरमुली शोधता शोधता वय निघून जात असताना अचानक एखाद्या सुस्वरूप तरुणीने आयुष्याची जोडीदार बनण्यास होकार द्यावा, तिच्या नातेवाईकांनीही मोठ्या आस्थेने जावई म्हणून आदरातिथ्य करावे, असे झाले तर त्या व्यक्तीला किती आनंद होईल, ते केवळ ती व्यक्तीच सांगू शकते. अन् लग्न समारंभावर लाखो रुपये खर्ची घातल्यानंतर लग्नाचे सुख उपभोगू न देता हळदीच्या ओल्या अंगानेच नवरी मुलगी पळून जात असेल, त्यानंतर तिचे नातेवाईक ‘झाले गेले विसरून जा’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्या व्यक्तीला होणारे दु:खही केवळ तीच व्यक्ती जाणू शकते. सुख-दु:खाचा असा बाजार मांडणाऱ्या कळमना- पाचपावलीतील ‘लगिनजोड्या-संसारमोड्या टोळीने ’ अनेकांच्या जीवनाचा खेळखंडोबा केला आहे. २५ मार्चला कळमना पोलिसांनी जेरबंद केलेल्या या टोळीने अवघ्या नऊ दिवसात दोन गुजराती इसमांचे लग्न लावले आणि दोन आठवड्यातच त्यांचा संसार उधळून विवाहाचे गोडगुलाबी स्वप्नही मोडले. टोळीचा शिकार ठरलेल्या पटेल नामक व्यक्तीने मंगळवारी कळमना ठाण्यात येऊन आपली कैफियत ऐकवली. त्यातून या टोळीतील सदस्यांच्या शक्कलबाजीचा खुलासा झाला आहे. गुजरातमधील काही भागात मुलींचा जन्मदर फारच कमी आहे. त्यामुळे त्या भागातील अनेक तरुण, मुली शोधता शोधता प्रौढ होतात. परिणामी आजूबाजूच्या प्रांतात जोडीदारासाठी रक्कम खर्ची घालून ते आपले लग्न करून घेतात. रामभरोसे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गीर सोमनाथ वेरावेल येथील पीयूष कृष्णदास रूपारेल यांनी अशाच प्रकारे २७ फेब्रुवारी २०१६ ला सीताबर्डीतील श्री ब्रह्मादत्त पुजारी सेवा मंडळात नेहा हेडावू नामक तरुणीशी लग्न लावून घेतले. हे लग्न करण्यासाठी त्याने चार ते पाच लाखांचा खर्च केला. आपल्या गावात धूमधडाक्यात रिसेप्शन दिले. ‘पप्पू पास हो गया’च्या थाटात त्याच्या आप्तस्वकियांनी, गावकऱ्यांनीही आनंदोत्सव साजरा करीत पीयूषला भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, कसले काय. नेहाने त्याला लग्नानंतर तब्बल १०-१२ दिवस हातच लावू दिला नाही. त्यानंतर तिच्या टोळीतील सूत्रधाराचा फोन आला आणि नेहाची मावशी स्फोटात मेल्याचे सांगत तिला तातडीने नागपुरात घेऊन येण्यास सांगितले. भाबडा पीयूष सासूच्या मृत्यूचा शोक मनवत रेल्वेने १२ मार्चला नागपूर स्थानकावर आला अन् येथून नेहा तिच्या साथीदारांसोबत गायब झाली.