दिल्लीच्या तरुणीची सुटका : दोन महिलांसह चार आरोपी गजाआडनागपूर : स्वत:च कुंटणखाना चालवायचा. तेथे महिला-मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घ्यायचा. प्रतिष्ठित ग्राहक रूममध्ये गेल्यानंतर आपणच साथीदारांसह पोलिसांच्या आविर्भावात तेथे धाड घालायची आणि त्या ग्राहकाकडून बदनामीचा धाक दाखवत कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपये उकळायचे, अशी अफलातून कार्यपध्दत अवलंबणाऱ्या एका टोळीचा गुन्हेशाखेच्या पोलिसांनी छडा लावला. त्यांच्याकडून एका दिल्लीतील मुलीची सुटका केली तर, दोन महिलांसह चार जणांना अटक केली. खुद्द पोलिसांनाच चक्रावून टाकणारे हे प्रकरण आहे.एमआयडीसीतील सारिका महेश पांडे (वय ३०, रा. जयताळा) ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय करवून घेते. गेल्या वर्षी पोलिसांनी तिच्या राय टाऊनमधील कुंटणखान्यावर धाड घातली. तिचा कुंटणखानाही सील केला. पोलिसांच्या कारवाईनंतर बाहेर आलेल्या सारिकाला तिच्याकडे असलेले श्रीमंत ग्राहक महिला-मुलींची मागणी करू लागले. त्यांना महिला मुली पुरविण्यासोबतच सारिका आणि तिच्या साथीदारांनी वेगळी शक्कल लढवली. कुंटणखाना चालविण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणाहून नवनवीन महिला मुलींना आपल्या टोळीत सहभागी करून घेतले. काम दाखवण्याचे आमिष दाखवून ते बाहेरगावच्या महिला, मुलींना नागपुरात बोलवायचे आणि येथे डांबून ठेवत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घ्यायचे. शनिवारच्या कारवाईत त्यांना कुंटणखान्यावरतरुणी सापडली. पोलिसांनी तिची सुटका केली.
कुंटणखान्यावर आढळली तोतया पोलिसांची टोळी
By admin | Updated: July 12, 2015 03:05 IST