शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘प्रधानमंत्री आवास’साठी दलालांची टोळी; पीडितांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:17 IST

नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर दलालांची टोळीच्या बिंग फुटले.

ठळक मुद्देअनेकांकडून उकळली हजारोंची रक्कम सोडतीनंतर फुटले दलालांचे बिंग

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पात घरकुल मिळवून देतो, अशी थाप मारून एका टोळीने घरकुल मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर या टोळीचे बिंग फुटले. त्यामुळे या टोळीने ज्यांच्याकडून रक्कम उकळली त्यांना आता उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.कुणीही झोपड्यात राहू नये, सर्वांना चांगली घरे मिळावी या हेतूने केंद्र सरकारने ठिकठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना राबविली. योजनेच्या प्रारंभी इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. घरकुलांच्या अर्जासाठी सुरुवातीला १०,५६० रुपये शुल्क आकारले गेले होते. गरीब लोक ांना ही रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले. १०,१५६ लोकांनी अर्ज नेले. यातील ८,४८१ लोकांनी अर्ज भरले. त्यापैकी ७,३५४ अर्जदार लाभार्थी (पात्र) ठरले. त्यांच्यासाठी वाठोडा, तरोडी, वांजरी यासारख्या पाच ठिकाणी सर्वसुविधांयुक्त घरे बांधण्यात आली. पहिल्या टप्प्यात ४,३४५ घरकुलांचे वाटप करण्याचे निश्चित झाले. या घराची मालकी देण्यासाठी अत्यंत पारदर्शी पद्धतीचा वापर करण्यात आला. रविवारी, ११ आॅगस्टला आॅनलाईन लॉटरी (सोडत) काढण्यात आली. सरकार आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नोडल एजंसी म्हणून काम करणारे एनआयटी प्रशासनातील उच्चपदस्थ पारदर्शीपणे काम करीत असताना काही भ्रष्ट प्रवृत्तीने या प्रकल्प प्रक्रियेत शिरकाव केला. त्यांनी अर्जदारांची कुठून आणि कशी यादी मिळवली कळायला मार्ग नाही. त्यांनी काही जणांना संपर्क करून तुम्हाला जेथे पाहिजे त्या ठिकाणी (तळमाळा, पहिला माळा, दुसरा माळा) घरकुल मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी ३० हजार रुपये भरावे लागतील, असे या भामटे सांगू लागले. आपण एनआयटीतून बोलतो, असेही हे भामटे सांगत होते.अर्जाच्या फोटो कॉपी व्हॉटस्अ‍ॅपवरविशेष म्हणजे, हे भामटे ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता त्याला त्यांच्या अर्जाच्या फोटो कॉपी व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवू लागले. त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. मे महिन्यांपासून सक्रिय झालेल्या या टोळीच्या थापेबाजीला अनेकजण बळी पडले. एनआयटीतूनच सर्व होणार असल्याची माहिती असल्याने आणि एनआयटीतून बोलतो, असे या टोळीतील भामटे सांगत असल्याने अनेकांनी मनासारखे घरकुल मिळावे म्हणून या टोळीतील भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. दरम्यान, आपल्याला आता जेव्हा केव्हा सोडत होईल तेव्हा मनासारखे घर मिळेल, असे मनोमन स्वप्न रंगविणाऱ्यांचा रविवारी झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमानंतर स्वप्नभंग झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी या टोळीतील भामट्यांना आपली रक्कम परत मागणे सुरू केले. काहींना अर्धवट रक्कम देऊन आरोपींनी आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी