शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गणेशोत्सव मंडळे लागली तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 08:21 IST

यंदा भव्य शोभायात्रेसह बाप्पाचे आगमन होणार नाही. दर्शनासाठी सुद्धा लांगलचक रांगा राहणार नाहीत. विविध स्पर्धा आणि महाप्रसादांचे आयोजनही होणार नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे नियम आणि नागरिकांच्या सुरक्षेवर अधिक भर

धीरज शुक्लालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेशोत्सवाला अजून बराच वेळ असला तरी गणेश मंडळे तयारीला लागली आहेत. शहरातील जवळपास १२०० ते १३०० वर लहानमोठी गणेश मंडळे प्रशासनाकडून मिळणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. भक्तांना कोविड-१९ पासून वाचवण्यासाठी सर्व उपाययोजनांवर मंथन केले जात आहे. मंडळे यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा विचार करीत आहेत.यंदा भव्य शोभायात्रेसह बाप्पाचे आगमन होणार नाही. दर्शनासाठी सुद्धा लांगलचक रांगा राहणार नाहीत. विविध स्पर्धा आणि महाप्रसादांचे आयोजनही होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर अनेक मंडळांनी ४ फुटाच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंडपामध्ये सुद्धा मोजकेच पदाधिकारी राहतील. यातही सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्याचीही तयारी केली जात आहे. लोकमतने अशाच काही मंडळांशी त्यांच्या तयारीसंदर्भात चर्चा केली. तेव्हा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देत शासन-प्रशासनाकडून लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रशासनाकडून जे काही दिशानिर्देश दिले जातील, त्याचे पूर्णपणे पालन केले जाईल, असेही सांगितले.श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळसीए रोड दारोडकर चौक येथील श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाचे संयोजक संजय चिंचोळे यांनी सांगितले, आम्ही ४ फुटाचीच गणेशमूर्ती स्थापन करून परंपरा सुरु करण्याचा विचार करीत आहोत. केवळ आजूबाजूच्या मोजक्या लोकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल किंवा आॅनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. कुठल्याही प्रकारची भव्यता राहणार नाही. साधेपणाने परंतु परंपरेनुसार पूजा-पाठ, अनुष्ठान, आरती केली जाईल. अध्यक्ष राजेश श्रीमानकर यांनी सांगितले की, गेल्या ६० वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यावर्षी आॅनलाईन दर्शनासह आॅनलाईन स्पर्धांचेही आयोजन केले जाऊ शकते. महाप्रसाद आदी होणार नाही. 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव