शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव २०२१; मूर्ती आमची.. किंमत तुमची...; कापड व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:30 IST

Nagpur News नागपुरात महालमधील एका कापड व्यवसायिकाने ग्राहक भाविकांसाठी अनोखा उपक्रम चालविला आहे. दानपेटीमध्ये मनाप्रमाणे दान करून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती घरी नेण्याची संधी दुकानदाराने उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्देगोळा झालेला निधी अनाथाश्रमातील मुलांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्तींना मागणी असते. भाविक आपल्या शक्यतेप्रमाणे गणेश मूर्तींची खरेदी करून घरी स्थापना करीत असतात. महालमधील एका कापड व्यवसायिकाने ग्राहक भाविकांसाठी अनोखा उपक्रम चालविला आहे. दानपेटीमध्ये मनाप्रमाणे दान करून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती घरी नेण्याची संधी दुकानदाराने उपलब्ध केली आहे. (Ganeshotsav 2021; The idol is ours .. the price is yours ...; A unique venture of a textile professional)

शिवाजी पुतळा ते गांधीसागर तलाव रोडवरील या कापड व्यवसायिकाने दुकानामध्ये लहान मूर्तींचे प्रदर्शन लावले आहे. मात्र या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या नाहीत. भाविकांनी एक रूपयापासून यथाशक्ती कितीही दान करावे, त्यांना ही मर्ती दिली जात आहे. दुकान मालक नरेंद्र वनवानी यांनी सांगितले, या मूर्ती अनाथाश्रमाच्या मुलांनीच तयार केल्या आहेत. त्या संपूर्णपणे मातीच्या असून पीओपी मूर्त्यांमुळे पर्यावरणाचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्याचे वनवानी यांनी सांगितले. दानरुपात गोळा होणारा निधी पुढे अनाथाश्रमातील मुलांच्या मदतीसाठीच दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवात एक सामाजिक कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव