शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनच घेता येणार गणेशाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यासंबंधित जिल्हा प्रशासनातर्फे नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यासंबंधित जिल्हा प्रशासनातर्फे नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांमध्ये आता गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यात प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी गुरुवारी कळविले आहे.

कोरोनाच्या संसर्गवाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभूत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातही मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे सुसंगत व मर्यादित मंडप उभारावे. सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी. सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटांचा असावा. शक्यतो घरातील धातू/संगमरवर या मूर्तीचे पूजन करावे. शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास घरी विसर्जन करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे. घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणपती आणताना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.

नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान यांच्या आयोजनावर भर द्यावा. आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.

गणेश मंडळांनी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाइट, ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी. राज्यातली कोरोना विषाणूची संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने गणेशोत्सवासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही कोरोनाच्या जागतिक साथीमुळे राज्यामध्ये गणेशोत्सवासाठीच्या विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. विसर्जनाआधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी. एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.