शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आझमगडच्या मातीतून साकारणार गणेशमूर्ती; नागपुरात पहिल्यांदा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 20:37 IST

Nagpur News नागपुरातील काही मूर्तिकार यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील आझमगडच्या मातीपासून सुबक, सुंदर, टिकाऊ गणेशमूर्ती साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे.

ठळक मुद्देसुंदर, रेखीव, टिकाऊ व ‘रेडी टू यूज’ मूर्ती

नागपूर : नागपुरातील काही मूर्तिकार यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील आझमगडच्या मातीपासून सुबक, सुंदर, टिकाऊ गणेशमूर्ती साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. नागपूरच्या मातीप्रमाणे या मातीवर कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. माती ‘रेडी टू यूज’ आहे. या मातीपासून पहिल्यांदाच लहान आणि मोठी मूर्ती तयार होणार आहेत. माती महाग असली तरीही मूर्तीची किंमत वाढणार नाही.

स्थानिकच्या तुलनेत मातीची किंमत जास्त

आझमगडची माती टिकाऊ आहे. त्यामुळे अन्य मातीच्या तुलनेत या मातीपासून तयार होणारी मूर्ती सुबक, सुंदर, रेखीव बनते. पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक म्हणाले, व्यावसायिक दृष्टिकोनातून शोध घेतला असता आझमगडच्या मातीचा पर्याय सापडला आणि खाणीतून काढलेली माती नागपुरात आणली. ३२ टन मातीची (एक ट्रक) किंमत ८५ हजार रुपये आहे. यात वाहतूक आणि अन्य खर्चाचा समावेश आहे. चार मूर्तिकार मिळून मातीचा ट्रक मागविला आहे. मातीत खडे, दगड नसल्यामुळे प्रक्रिया करण्याची गरज नाही. लवचीक असल्यामुळे थेट पाण्यात टाकून मूर्ती तयार करण्यासाठी वापरता येते. अन्य शाडूमातीचा विचार केल्यास ती गुजरातमधून येते. या मातीच्या तुलनेत आझमगडची माती ३० रुपयांनी स्वस्त आहे. अर्थात ३२० रुपयांत ५० किलो माती पडते. या मातीपासून तयार होणारी मूर्ती टणक असल्यामुळे रंग कमी प्रमाणात शोषून घेते. तसेच मूर्ती रेखीव बनते व उठून दिसते. मातीचा खर्च जास्त असला तरीही मूर्तीची किंमत वाढविण्यात येणार नाही.

नागपुरात सावरगाव व आंधळगावची माती

पाठक म्हणाले, नागपुरातील सर्वच मूर्तिकार नरखेड तालुक्यातील सावरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील माती मूर्ती तयार करण्यासाठी बोलवतात. सावरगावच्या चार टन मातीसाठी ७ हजार आणि             आंधळगावच्या सहा टन मातीसाठी ७ हजार रुपये खर्च येतो. चार दिवस प्रक्रिया केल्यानंतर माती मूर्ती बनविण्यासाठी तयार होते. पण या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीला अनेकदा तडे जातात. शिवाय शाडूमातीच्या मूर्ती ठिसूळ बनतात. त्या जास्त अंतरावर पाठविता येत नाहीत.

आझमगड मातीचा प्रयोग पहिल्यांदा नागपुरात करण्यात येत आहे. याची माहिती सर्व मूर्तिकारांना झाल्यामुळे पुढे सर्वच मूर्तिकार या मातीचा उपयोग करतील. पुढे या मातीला आणि मातीपासून तयार केलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींना मागणी वाढणार असल्याचे सुरेश पाठक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव