शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

Ganesh Festival 2018; गणपती स्थापना: काय सांगते शास्त्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:35 IST

ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत.

ठळक मुद्देप्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत करा स्थापना

 डॉ. अनिल वैद्य.लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत.

प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत करा स्थापनागुरुवार दि. १३ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी सिद्धिविनायकाच्या मृण्मय मूर्तीची स्थापना करून पूजन केले जाते. या दिवशी दुपारी २.४९ पर्यंत भद्रा आहे. भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नसतो. त्यामुळे प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत (अंदाजे दुपारी १.३० वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येते. तरीसुद्धा गुरुवारी ज्यावेळी नवग्रहांपैकी शुभ ग्रह गुरु, शुक्र, बुध व चंद्राचा जास्त शुभप्रभाव वातावरण असेल ती वेळ ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली निवडल्यास फायदेशीर ठरेल. तरीसुद्धा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना वरील वेळेव्यतिरिक्त सायंकाळी ६.३० पर्यंत केली तरी चालेल. गुरुवारी राहू काल दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत आहे. श्री गणेश पूजन आणि स्थापनेसाठी याचा विचार करण्याची गरज नाही.

ईशान्य, पूर्व दिशा योग्यगणपतीची स्थापना ईशान्य, पूर्व दिशेला करून पूजन केल्यास उत्तम. देवकर्मासाठी ताजी फुले आणा. ती न सुकलेली आणि न किडलेली असावीत. तसेच देठासह वाहावीत. गणेशाला दुर्वा आणि लाल फुले अतिशय प्रिय आहेत. फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी गणेशाला तुळस वाहतात. दुर्वा आठ दिवसांनी शिळ्या होतात. शमी सहा दिवस शिळे होत नाही. ताजी फुले वाहिल्याने आपल्याला व देवाला आनंद होतो. आपल्याला प्रसन्न वाटते. शास्त्रात सांगितले आहे की तुळस ही कधीच शिळी होत नाही. सच्छिद्र झालेली फुले पर्युषित समजतात. देवाचे निर्माल्य काढताना तर्जनी व अंगठा या दोन बोटांचा उपयोग करावा. देवाला फुले वाहताना अंगठा, मध्यमा व अनामिका यांचा उपयोग करावा.

असे करा पूजनसकाळी स्थापना व पूजनाच्या वेळी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. रोज रात्री तेलाचा दिवा देवस्थळाच्या आग्नेय दिशेस लावावा. नैवेद्याचे ताट वाढल्यावर तूप वाढून तुळशीची पाने पदार्थांवर ठेवावीत. देवासमोर पाण्याने एक चौकोनी मंडळ काढावे, त्यावर पाट आणि पाटावर नैवेद्य ठेवावा. डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन ते प्रसादाभोवती प्रदशिक्षणाकार तीनदा फिरवावे. नंतर एक पळी पाणी ताह्मणात सोडावे. नंतर हा प्रसाद पाच वायूंना अर्पण करावा. यासाठी प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाथ स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा म्हणावे. यामुळे शरीरातील पाच वायू ब्रह्मात विलीन होतात. नैवेद्य दाखवून मग त्याचे सेवन करावे.

‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’देवासमोर उभे राहून किंवा बसूनसुद्धा त्यालाच दाखवलेला प्रसाद खाऊ नये. देवाचा प्रसाद फारच अमूल्य आहे. तो पायदळी तुडवू नका. प्रसाद खाल्ल्यावर किमान घोटभर पाणी आवश्य प्यावे. डोळे मिटून कधीही देवाचे दर्शन घेऊ नका. दोन्ही हात जोडून देवाच्या चरणांकडे किंवा डोळ्याकडे पाहावे. देव तुमच्यासाठी २४ तास जागृत असतो. मग तुम्ही डोळे बंद का करता? आपल्या लायकीप्रमाणेच देवाकडे मागा- कारण ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८