शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2018 : बाप्पा, सर्वांची संकटं दूर कर ! मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य यावे व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

ठळक मुद्देशहरातील विविध गणेश मंडळांना भेटी 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य यावे व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.विविध सार्वजनिक गणेश मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व विविध उपक्रमांची प्रशंसा करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आणि निरोगी व आनंदी जीवनाची मनोकामना केली. यावेळी लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.भेंडे ले-आऊट, दत्तनगर येथील श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनद्वारा संचलित श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस १५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी अध्यक्ष ईश्वर ढेंगळे, सचिव रमेश राऊत, कोषाध्यक्ष नीलेश राऊत, उपाध्यक्ष महेश गुडधे, प्रशांत दरेकर, दीपक चोपडे, संजय देशमुख, मदन कर्णिक, पीयूष मुसळे, नीलेश गायकवाड व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ सार्वजनिक गणेश मंडळ येथे भेट दिली व श्री गणेशाचे दर्शन घेतले. संयोजक सुनील हिरणवार यांनी स्वागत केले. वर्मा ले-आऊट येथील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे अध्यक्ष नितीन कडवे यांनी, सुभाष नगर येथील लोकमान्य सार्वजनिक गणेश मंडळातर्फे अध्यक्ष प्रमोद नागोलकर व मान्यवरांनी सत्कार केला. प्रसाद नगर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळातर्फे अध्यक्ष पीयूष कायदे यांनी, प्रताप नगर येथील बाल गणेश सार्वजनिक गणेश मंडळातर्फे सारंग कदम व मान्यवरांनी सत्कार केला. दाते ले-आऊट येथील शिवगणेश सार्वजनिक गणेश मंडळ, सोनेगाव व स्नेह नगर येथील सार्वजनिक गणेश मंडळ, मनीष नगर येथील गुरुकृपा सार्वजनिक गणेश मंडळ तसेच एकता सार्वजनिक गणेश मंडळ येथेही मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस