शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; विद्यार्थ्यांनी केला पंचगव्यापासून गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 10:11 IST

तलावांचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणपती उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी रविनगर येथील सी.पी.अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजविली. त्यासाठी त्यांनी पंचगव्यापासून गणपतीची निर्मिती केली.

ठळक मुद्देसी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलने रुजविली ईको फ्रेंडली संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तलावांचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणपती उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी रविनगर येथील सी.पी.अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजविली. त्यासाठी त्यांनी पंचगव्यापासून गणपतीची निर्मिती केली.प्रहार मिल्ट्री स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय ईको फ्रेंडली गणपती स्पर्धेत सी.पी.अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलचे सात विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत रितीक सुभाष व्यंकट या विद्यार्थ्याने दूध, दही,मध, तूप, गोमूत्र आदींचा वापर करून, गणेशाची निर्मिती केली. फूल, पाकळ्यांपासून रंग तयार केले. तुरटी, शेण आदींचाही वापर या गणपतीच्या निर्मितीसाठी करण्यात आला. या साहित्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आकर्षक गणरायाच्या कलाकृती साकारल्या. सोबतच एक झाड एक गणपती ही संकल्पना रुजविण्यासाठी त्यांनी गणपतीला आवडणाऱ्या मोदकाचा वापर केला. मातीचे मोदक तयार करून, कडुलिंब, चिक्कू, जांभूळ आदी झाडांच्या बिया मोदकांमध्ये टाकल्या. प्रसादाच्या रूपात देण्यात येणारे मोदक विद्यार्थ्यांना देऊन, एक झाड लावण्याचे आवाहन केले. रितीक व्यंकट याच्या नेतृत्वात ईको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक संदेश देणाºया गणपतीचे स्पर्धेत कौतुक झाले. त्याच्या या अभिनव कल्पनेबद्दल त्याला पुरस्कृतही करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही गाडे, उपमुख्याध्यापिका अणे, पर्यवेक्षिका देशपांडे यांनी रितीक आणि त्याच्या टीमचे कौतुक केले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८