शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आदिगुरुश्रीगणकाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 09:44 IST

 गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते.

ठळक मुद्देश्रीगणेश अथर्वशीर्षाचे ऋषी आहेत भगवान गणकाचार्य

 प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते. गणेश उपासकांमध्ये सर्वश्रेष्ठ रूपात सर्वख्यात असलेले स्तोत्र म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. या श्रीगणेश अथर्वशीर्षाचे ऋषी आहेत भगवान गणकाचार्य. त्यांच्या त्या ऋषित्वाचा श्रीगणेश अथर्वशीर्षातच ‘गणक ऋषि:’ असा सुस्पष्ट उल्लेख पाहावयास मिळतो. गणेश अथर्वशीर्ष हे श्रुती प्रस्थान, श्री गणेशगीता हे स्मृती प्रस्थान आणि महावाक्यदर्शनभूत परमाद्वैतसूत्र हे सूत्र प्रस्थान अशा प्रस्थानत्रयीची मांडणी करून श्री गणकाचार्यांनी गाणपत्य संप्रदायाची मुहूर्तमेढ केली. याशिवाय ब्रह्मज्ञानसुखोदय नामक दिव्य ग्रंथाची रचना त्यांनी केल्याचा उल्लेख मिळतो. मात्र दुर्दैवाने त्यांचे या तीनही प्रस्थानावरील भाष्य किंवा हा ग्रंथ हे काहीही साहित्य आज उपलब्ध नाही. भगवान श्रीगणेशांच्या सगुण साकार रूपाला गाणपत्य संप्रदायात श्रीगुणेश असे म्हटले जाते. पाचही देवतांचे एकत्रित रूप असे श्रीगुणेश दशभुज रूपात वर्णिले असतात. यांनाच श्री वल्लभेश असेही म्हणतात. याच श्रीगुणेशांचे गुरुरूपातील अवतरण म्हणजे श्री गणकाचार्य होय. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा प्रगटदिन, कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा दिग्विजय आरंभ दिन, माघ शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा श्रीक्षेत्र मोरगाव येथील ब्रह्मभूयमहासिद्धीपीठावर गुरुपदी आरूढ होण्याचा दिवस आणि वैशाख शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा अवतार समाप्ती दिवस. या चारही पौर्णिमांना गाणपत्य संप्रदायात गुरुपौर्णिमा म्हणूनच साजरे केले जाते. श्रीक्षेत्र मोरगावला सभामंडपामध्ये जे कासव मांडलेले आहे ते श्रीगणकाचार्यांचे स्थान होय. त्यांच्या निर्गुणत्वाचा आदर म्हणून तिथे त्याच रूपात त्यांची पूजा केली जाते. जसे ते कासव भगवंताकडेच जाते तसेच सर्व भक्तांना हळुवारपणे भगवंताकडे घेऊन जाणारे आदिगुरु म्हणून श्री गणकाचार्यांना गाणपत्य संप्रदायात परब्रह्म गुरु म्हणून वंदन केले जाते.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८