शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आद्यकलियुगाचार्य महर्षी गिरिजासुत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 09:33 IST

पंचकात वर्णन केलेले श्री वेदव्यास कलियुगाचा आरंभी श्री गिरिजासुत रूपात अवतीर्ण होत असतात, असे गाणपत्य संप्रदाय सांगतो.

प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:पंचकात वर्णन केलेले श्री वेदव्यास कलियुगाचा आरंभी श्री गिरिजासुत रूपात अवतीर्ण होत असतात, असे गाणपत्य संप्रदाय सांगतो. देवी पार्वतीने गणेश उपासना करून निर्माण केलेले स्थान आपण लेण्याद्री या नावाने ओळखतो. येथे भगवान गणेश गिरिजात्मज नावाने विराजमान आहेत. त्यांच्या चरणाशी असलेल्या जुन्नरनामक गावात श्री गणेश्वर शास्त्री आणि देवी महालक्ष्मी या तप:पूत दाम्पत्याच्या उदरी महर्षी गिरिजासुतांचा जन्म झाला. प्रदीर्घ काळ अपत्य नसल्याने या दाम्पत्याने श्री गिरिजात्मजांची जोपासना केली आणि त्यांनी स्वप्नदृष्टांत दिल्यावर जन्माला आलेली ही महान विभूती. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा यांचा प्रकटदिन. आरंभीचे शिक्षण वडिलांच्या जवळ झाल्यावर चैत्र शुद्ध द्वितीयेला श्रीवल्लभेश मंत्राची दीक्षा मिळाली. आपल्या दिव्यतम साधनेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी गणेश विजय नामक एका ग्रंथाची रचना केली; यात आचार, लीला, उपासना आणि ज्ञान अशा चार कांडांची विभागणी पाहावयास मिळते. याशिवाय सर्वसार संग्रह, बालदीक्षा, प्रौढशिक्षा असे ग्रंथही त्यांनी निर्माण केले.महर्षी गिरिजासुत आणि जगद्गुरु आदिशंकराचार्य यांचा संवाद झाल्याचे वर्णन शंकर दिग्विजयातदेखील आहे. याप्रसंगी केवलाद्वैत सिद्धांत आणि गाणपत्य विचारसरणी एकच असून फरक असेल तर तो केवळ परिभाषांचा आहे, हे श्रीगिरिजासुतांनी श्री आचार्यांच्यासमोर सांगितल्यावर त्यांनी श्री गिरिजासुतांना गाणपत्य प्रचाराचा अधिकार प्रदान केला. त्यानुसार मोरगावला येऊन ब्रह्मभूयमहासिद्धिपीठावर आरूढ होऊन महर्षी गिरिजासुतांनी कलियुगाच्या आरंभी गणेश धर्माची पताका फडकवत ठेवली. माघ शुद्ध पौर्णिमेला स्वानंद गमन केलेल्या गिरिजासुतांनी स्थापिलेल्या स्थानाला सध्या जुन्नरमध्ये महाजनांचा गणपती म्हणून ओळखले जाते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८