शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; ‘गाणपत्य आचार्य परंपरा’ ; भगवान श्रीमुदगलाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 09:35 IST

केलेल्या कर्माचे फळ मिळणार नसेल तर अशा तुमच्या स्वर्गात राहण्यापेक्षा माझी ही भारतभूमी पवित्र आहे. मी येथेच राहील, असे थेट देवदूतांना सांगून स्वर्गाचे विमान परत करणारी भारतीय इतिहासातील अद्वितीय विभूती म्हणजे श्री मुद्गल आचार्य.

ठळक मुद्देमुद म्हणजे आनंद आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे

प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देवदूतांनो! जर स्वर्गात गेल्यावरही पुण्याच्या स्तरानुसार फळ मिळत असल्याने मत्सर शिल्लकच राहत असेल, जर पुण्य संपल्याक्षणी त्याला खाली ढकलून दिल्या जात असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेथे केलेल्या कर्माचे फळ मिळणार नसेल तर अशा तुमच्या स्वर्गात राहण्यापेक्षा माझी ही भारतभूमी पवित्र आहे. मी येथेच राहील, असे थेट देवदूतांना सांगून स्वर्गाचे विमान परत करणारी भारतीय इतिहासातील अद्वितीय विभूती म्हणजे श्री मुद्गल आचार्य. भगवान श्री गणेशांच्या हातातील मुद्गल श्री सूर्य रूपात प्रगट होतो. सूर्याचे काम आहे अंधकार दूर करणे, तर मुद्गलाचे काम आहे प्रत्येक गोष्टीचे चूर्ण करणे. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करून श्री गुरु मुद्गलाचार्यांचे कार्य चालते. श्री गुरु-शिष्यांच्या अज्ञानरूपी अंधकाराला दूर करतात आणि त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अहंकारादिक सगळ्या विकृतींचा चुराडा करतात. त्यामुळे भगवान मुद्गल हे मुदगरांश म्हणून शोभून दिसतात. मुद म्हणजे आनंद आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि विचारातून आनंद ओसंडून वाहतो त्यांना मुद्गल असे म्हणतात. दक्ष यज्ञ विनाशाच्या वेळी मस्तक कापलेल्या दक्षाला नंतर बोकडाचे डोके बसवण्यात आले त्यावेळी आत्मविस्मृत झालेल्या दक्षाला महर्षी मुद्गलांनी केलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. भगवान गणेशांना यथार्थरीतीने समजून घ्यायचे असेल तर श्रीमुद्गलपुराणाला पर्याय नाही. मानवाला आपल्या जीवनात परम आनंदी होण्याचा अंतिम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण. या महर्षी मुद्गलांचा आश्रम नागपूरजवळील अदोष (अदासा) क्षेत्रावर होता. येथे श्री मुद्गलांनी पूजिलेले भगवान श्री शमीविघ्नेश आजही जगाला आनंद देण्यासाठी विराजमान आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८