शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार  : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:51 IST

महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.

ठळक मुद्देजागतिक अहिंसा दिन आयोजन समितीची व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती आणि स्वयंम् सामाजिक संस्थेच्या वतीने विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात सुरेश द्वादशीवार यांचे ‘सामाजिक एकतेसाठी गांधी विचारांची गरज’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. व्याख्यानात द्वादशीवार म्हणाले, धर्म ही केवळ माणसांना संघटित करणारीच नव्हे तर दूर करणारीही व्यवस्था आहे. भारतासह जगाच्या पाठीवर धर्माच्या नावाखाली अनेक लढाया झाला. धर्मातच नव्हे तर धर्माच्या पंथातही लढाया झाल्या. १४ व्या शतकात १२ कोटींपैकी ४० लाख माणसे या लढाईत मारली गेली. म्हणूनच वैर विसरा आणि एकत्र या, असे आवाहन गांधी करायचे.धर्म हा मानवनिर्मित आहे. मात्र यापुढेही माणुसकीचा धर्म व्यापून उरतो. देशाच्या फाळणीनंतर दंगली उसळल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी त्या शमविण्यासाठी फिरत राहिले. कोलकात्यामध्ये दंगली पेटल्यावर ते पाकिस्तानचे नेते शहीद सुरावर्दी यांना सोबत घेऊन गल्लीबोळातून शांततेचे आवाहन करत फिरत होते. ३० ऑगस्टला एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी मुक्कामाला असताना त्यांच्यावर बाहेरील व्यक्तींनी हल्ला केला. डोक्यावर सुरा मारला. देश स्वातंत्र्याचा आनंद लुटत असताना गांधी मात्र शांतीचे आवाहन करीत मार खात फिरत होते. ३० जानेवारी या गांधी हत्येचा प्रसंगही त्यांनी व्याख्यानातून उभा केला. ज्या महात्म्याने आयुष्यभर अहिंसा सांगितली, त्यांचाच शेवट हिंसेतून झाला. त्यातूनही जगात अहिंसेचाच संदेश गेला, हीच त्यांच्या आयुष्याची खरी ताकद आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी प्रास्ताविक विलास मुत्तेमवार यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विशाल मुत्तेमवार यांनी मानले.‘ही’ तर गांधींची दुसरी हत्याचइंग्रज सरकारने आणलेला रौलट अ‍ॅक्ट हा भारतीयांना गुलाम करणारा आणि भारतीयांचे हक्क हिसकावणारा कायदा होता. २०२० च्या प्र्रारंभी देशात येऊ घातलेले कायदे देशातील अल्पसंख्यकांवर असेच अन्याय करणारे आहेत. वर्षानुवर्षे हयात घालविणाऱ्यांना प्रमाणपत्र मागणे ही गांधींची दुसरी हत्याच आहे, अशी टीका द्वादशीवार यांनी केली.