शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नागपुरातील गांधीसागर मर्डर मिस्ट्री : राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:38 IST

गांधीसागर तलावातील हत्याकांडाच्या तपासाला पोलीस महासंचालनालयातून राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देठाणेदार हिवरे आणि चमूला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावातील हत्याकांडाच्या तपासाला पोलीस महासंचालनालयातून राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आले आहे. कोणताही पुरावा नसताना अन् मृताची ओळख पटण्यासारखे कोणतेही चिन्ह नसताना मारेकऱ्यांचा छडा लावून एका गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा उलगडा केल्याबद्दल लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही जाहीर केले आहे.जुलै २०१९ मध्ये गांधीसागर तलावात दोन पोते आढळली होती. या दोन्ही पोत्यात एका व्यक्तीच्या शरीराचे सात तुकडे आढळले होते. मृतदेह ओळखू येत नसल्याने मारेकऱ्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी जिकरीचे काम ठरले होते. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी गुन्हे शाखेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी आपल्या पथकातील सहकाऱ्यांसह तब्बल २८ दिवस तपास केला. या दरम्यान मृताची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता नोंद असलेल्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करून घेतली. सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले अन् अखेर मृत व्यक्ती सुधाकर रंगारी (वय २८, रा. जरीपटका) असल्याचे शोधून काढले. त्याची हत्या करणारे आरोपी राहुल पद्माकर भोतमांगे आणि राहुल ज्ञानेश्वर धापोडकर (रा. तांडापेठ) या दोघांना अटक केली. आरोपींनी हत्या केल्यानंतर तुकडे करण्यासाठी वापरलेले कटर तसेच मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून तलावात टाकण्यासाठी वापरण्यात आलेला ई-रिक्षाही जप्त केला.पोलीस महासंचालनालयातून या तपासाला सप्टेंबर २०१९ चा राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आला. त्यानुसार सध्या लकडगंजचे ठाणेदार असलेले नरेंद्र हिवरे आणि एपीआय पंकज धाडगे, नीतेश डोर्लीकर, एएसआय राजेंद्र बघेल आणि संदीप मावलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही जाहीर केले.मुंबईत होणार गौरवया सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुंबईत पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव होणार आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या तपासाबाबत यापूर्वीच ७५ हजारांचा रोख पुरस्कार देऊन हिवरे आणि चमूला गौरविले होते. २००३ मध्ये हिवरे खापा ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यावेळी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा केला होता. त्याहीवेळी त्यांच्या तपासाला राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास म्हणून गौरविण्यात आले होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या तपासाबाबत हिवरे आणि त्यांच्या चमूला हा पुरस्कार देऊन त्यांचे अभिनंदन केले.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस