लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री, राज्य भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांनी विनय आकुलवार यांच्यासोबत महावीरनगरातील पुलक मंच परिवाराच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रिचा जैन, शाखा अध्यक्ष शरद मचाले उपस्थित होते.
याप्रसंगी हर्षद महात्मे यांनी कार्यवृत्तांत सादर केला. ललित गांधी व संदीप भंडारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संचालन परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड यांनी केले. यावेळी दिलीप शिवणकर, महेन्द्रकुमार कटारिया, प्रकाश मारवडकर, सुभाष कोटेचा, दिलीप राखे, डॉ. नरेंद्र भुसारी, विनय सावळकर, संजय टक्कमोरे, बाहुबली पळसापुरे, दिलीप सावळकर, अरविंद हनवंते, नरेश जैन, संदीप जैन, सुदीप जैन, कुलभूषण डहाळे, प्रशांत भुसारी, राजेन्द्र सोनटक्के, प्रशांत सवाने, किशोर मेंढे, श्रीकांत धोपाडे, प्रमोद भागवतकर, अतुल महात्मे, जितेन्द्र गडेकर, प्रदीप तुपकर, सुरेश महात्मे, असलम खान, जुनेद भाई, राहुल महात्मे, नरेश मचाले, अनंतराव शिवणकर, नीलय मुधोळकर, अविनाश शहाकार, राजेश जैन, किरण मसाळकर, नीरज पळसापुरे, चिन्मय महाजन उपस्थित होते.