शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीकॉम’च्या परीक्षेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरळीत झालेल्या परीक्षाप्रणालीला मंगळवारी अचानक धक्का बसला.

ठळक मुद्देपरीक्षा केंद्रांवर आसनक्रमांकच नाही : वेळेवर मिळाली परीक्षा ओळखपत्रे;विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरळीत झालेल्या परीक्षाप्रणालीला मंगळवारी अचानक धक्का बसला. हिवाळी परीक्षांमधील तिसºया टप्प्याची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी धावपळ व मनस्तापाची ठरली. काही परीक्षा केंद्रांवर ‘बीकॉम’च्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांकच नसल्याचे चित्र होते तर शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अवघ्या दोन तासअगोदर परीक्षा ओळखपत्रे मिळाली. महाविद्यालयांनी ऐनवेळी परीक्षा अर्ज भरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यामधील समन्वयाचा अभाव समोर आला आहे.मंगळवारी ‘बीकॉम’च्या प्रथम सत्र परीक्षांना प्रारंभ झाला. वसंतराव नाईक शासकीय समाजविज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र होते. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर धक्काच बसला. कारण त्यांचा आसनक्रमांक सूचना फलकावर नमूदच नव्हता. परीक्षा ओळखपत्रावर हेच परीक्षा केंद्र असताना आमचा क्रमांक का नाही, असा प्रश्न केंद्र अधिकाºयांना विद्यार्थ्यांनी केला. मात्र आमच्याकडे आलेल्या यादीनुसारच आसनक्रमांक लिहिण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेर परीक्षा विभागात त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांसाठी एका वेगळ्या खोलीत पेपर लिहिण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे तेथील अधिकाºयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार अखेर वेळेवर या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली.मात्र या गोंधळात विद्यार्थी तणावात आले होते. असा प्रकार शहरातील आणखी काही परीक्षा केंद्रांवरदेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पेपरच्या दोन तासअगोदर मिळाले ओळखपत्रदरम्यान, परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रेच ‘डाऊनलोड’ झाली नव्हती. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चुका होत्या. वेळेवर परीक्षा अर्ज भरलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तर दुपारी १२ च्या सुमारास परीक्षा ओळखपत्रे देण्यात आली. तेथूनच विद्यार्थी थेट परीक्षा केंद्रावर गेले. त्यामुळे त्यांची बरीच धावपळ झाली.