शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

कळमन्यात बाल्या गावंडेचा गेम

By admin | Updated: January 24, 2017 02:41 IST

उपराजधानीतील मटकाकिंग आणि कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गोविंदराव गावंडे (वय ४०) याच्यासह

शहरात दोघांची हत्या : सदरमध्ये गर्दुल्याने वेल्डरला मारले नागपूर : उपराजधानीतील मटकाकिंग आणि कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गोविंदराव गावंडे (वय ४०) याच्यासह उपराजधानीत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. जेवणाच्या बहाण्याने बोलावून बाल्याची त्याच्या साथीदारांनीच निर्दयपणे हत्या केली. हत्येचे दोन गुन्हे आणि खंडणी वसुलीसह अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी बाल्या गावंडे महालमध्ये राहात होता. त्याच्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात सहभागी असलेला आरोपी योगेश कुंभारे-सावजी तुकारामनगर, कळमना येथे राहतो. तोसुद्धा खतरनाक गुन्हेगार असून, कुख्यात गुंड भरत मोहाडीकर याच्या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. बाल्या आणि योगेश दोघेही सध्या प्रॉपर्टी डीलिंगमध्ये सक्रिय होते. दरम्यान, योगेशने त्याच्या घरी रविवारी एका ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक गुन्हेगार सहभागी झाले होते. बाल्यालासुद्धा बोलावण्यात आले होते. त्यानुसार बाल्या त्याची पत्नी जयश्री आणि मुलीसोबत योगेशच्या घरी गेला होता. महिलांच्या जेवणाचा कार्यक्रम संपला तरी बाल्या, योगेश आणि त्याच्या गुंड साथीदारांचे खाणेपिणे सुरूच होते. त्यामुळे बाल्याने त्याची पत्नी जयश्री आणि मुलीला घरी पाठवून दिले. कटकारस्थानानुसार आरोपींनी मध्यरात्रीपर्यंत त्याला दारू पाजली. त्यानंतर एका ‘महिलेशी असलेल्या नाजूक संबंधाच्या’ चर्चेवरून आरोपी योगेश आणि साथीदारांसोबत बाल्याचा वाद झाला. मजबूत शरीरयष्टीचा बाल्या दारू चढल्याने शिवीगाळ करीत असल्याचे पाहून योगेश तसेच त्याच्या साथीदारांनी बाल्यावर घातक शस्त्रांचे सपासप घाव घालून त्याला जागीच ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी बाल्याचा मृतदेह बाजूच्या मैदानात फेकून दिला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. माहिती कळताच कळमन्याचे प्रभारी ठाणेदार राम मोहिते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अभिनाष कुमार यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपी योगेश कुंभारे आणि त्याचा मामा राजकुमार यादव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या सांगण्यावरून या प्रकरणात शुभम धनोरे, पिंकी ऊर्फ गंगाबाई कुंभारे यांच्यासह अनेक आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)