शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हे माझ्याविरुद्ध षङ्यंत्र आहे

By admin | Updated: January 18, 2017 02:18 IST

लाच मागितली नाही, पैशाला हात लावला नाही. अधिष्ठाता कक्षात आपल्या कामात मग्न असताना औषध पुरवठादार व मेसचे जेवण पुरविणारा

अधिष्ठाता गजभिये : मेयोतील लाच प्रकरण नागपूर : लाच मागितली नाही, पैशाला हात लावला नाही. अधिष्ठाता कक्षात आपल्या कामात मग्न असताना औषध पुरवठादार व मेसचे जेवण पुरविणारा विजय मिश्रा हे सोबतच कक्षात आले. मी त्यांना दाद दिली नाही, नंतर ते दोघे कक्षातीलच जेवणाच्या खोलीमध्ये गेले. खोलीच्या पडद्याआड व्यवहार केला. ६ डिसेंबर रोजी बाहेरून कुलूप लावणाऱ्या काही व्यक्तींविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची तक्रार दाखल केली होती. त्याचा सूड म्हणून ही कारवाई झाली असावी. हे माझ्याविरुद्ध षङ्यंत्र आहे, अशा लेखी माहितीचे पत्र मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये (वाहणे) यांनी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) पाठविले. मेडिकलच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये लाचेच्या कारवाईला सामोऱ्या गेल्या असता मंगळवारी नेहमीप्रमाणे त्यांनी रुग्णालयाचा राऊंड घेतला. बाह्यरुग्ण विभागापासून ते आकस्मिक विभाग व वॉर्डाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी ‘डीएमईआर’ला हे पत्र दिले. यात त्या म्हणाल्या, अधिष्ठातापदी रुजू होऊन पाचच महिने झाले आहे. अधिवेशनाच्या काळात दरवर्षीप्रमाणे अधिकाऱ्यांसाठी जेवण पुरविण्याची व्यवस्था काही मेडिकल दुकानदाराकडून करण्याची प्रथा आहे. यावर्षी ही व्यवस्था एका वरिष्ठ डॉक्टरने केली होती. याबाबत काहीच माहिती नव्हते. मला जेव्हा याबाबत औषध पुरवठादाराने विचारले तेव्हा तुम्हाला ज्याने कोणी सांगितले त्यांना विचारा, मी मध्ये पडणार नाही व पुढे माझ्याकडे यायचे नाही, असे सांगितले. सोमवारी अधिष्ठाता कक्षात आपल्या कामात मग्न असताना औषध पुरवठादार व मिश्रासोबत आले. औषध पुरवठादाराने पैशाला हात लावून मिश्रा याच्याकडे द्या, म्हणजे आनंद होईल, असे म्हणाला. परंतु त्याला दाद दिली नाही. नंतर ते दोघे २५ फुटावर असलेल्या जेवणाच्या खोलीत जाऊन व्यवहार केला. विशेष म्हणजे, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे तो व्यक्तीही त्यावेळी हजर होता. यामुळे बदनामी व फसविण्याच्या उद्देशाने हे षङ्यंत्र रचण्यात आले, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)