शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचे गडकरींना अनोखे ‘गिफ्ट’

By admin | Updated: May 28, 2016 02:50 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर सप्ताहाने एक इतिहास घडविला.

महाआरोग्य शिबिर : मतभेदांपलीकडचे भावनिक बंध नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर सप्ताहाने एक इतिहास घडविला. सात दिवस चाललेल्या या शिबिरात जवळपास २५ हजार रुग्णांना लाभ झाला. या शिबिरामुळे आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जसे बळ मिळाले तसेच राजकीय कार्यकर्त्यांनाही विधायक कार्याची एक दिशा गवसली. वास्तविक या महाआरोग्य शिबिराची मूळ कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. फडणवीस आणि गडकरी यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. या मतभेदाच्या खऱ्या आणि खोट्या बातम्या माध्यमात सतेत चर्चेत असतात. तर कार्यकर्त्यांच्या उमेदवारी नियुक्त्यांचे निमित्त साधून हे मतभेद विकोपाला कसे गेले आहेत, हेही चवीने सांगितले जाते. परंतु या दोघांमधील स्नेहाचे नाते या राजकीय मतभेदापलीकडचे आहे. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते समोर आले. दोन महिन्यांपूर्वी नागपूर भेटीत फडणवीस यांनी यावेळी नितीन गडकरी यांना वाढदिवसाची अनोखी ‘गिफ्ट’ देऊ, अशी भावना व्यक्त केली होती अन् त्यातूनच या महाआरोग्य शिबिराची कल्पना पुढे आली. भाजपाचे महामंत्री नगरसेवक संदीप जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आज शिबिराचा समारोप झाला. त्यावेळी उपस्थित अनेक रुग्णांनी व्यक्त केलेल्या सद्गदित भावना या शिबिराची यशस्वीता सांगणाऱ्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी वाढदिवसानिमित्त गडकरींना दिलेल्या या भावनिक ‘गिफ्ट’ने कार्यकर्त्यांनाही अपेक्षित असा संदेश गेलाच.(प्रतिनिधी)