शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी, फडणवीस यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: July 4, 2016 02:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा : संघ पदाधिकाऱ्यांचीही उपस्थितीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता आहे. यासंदर्भातच या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे गडकरी व फडणवीस या दोघांनीही सरसंघचालकांशी काही वेळेच्या अंतराने वेगवेगळी भेट घेतली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास मुख्यमंत्री रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची त्यांनी भेट घेतली व चर्चा केली. सायंकाळी ७.३० नंतर सरसंघचालक महाल येथील संघ मुख्यालयात गेले. तेथे गडकरी यांनी त्यांची भेट घेतली व चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची दाट शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे महसूल खाते कुणाला द्यायचे याबाबत पक्षाअंतर्गत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. भाजपातील सध्याचे अंतर्गत वातावरण लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान विभागीय व सामाजिक समतोल राखण्याचे आव्हान आहे. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय पक्षातील अंतर्गत राजकारण, मित्रपक्षांसोबतचे संबंध इत्यादीबाबतदेखील यावेळी चर्चा झाली. सरसंघचालकांनीदेखील काही समाज, संघटनांचे प्रश्न मुख्यमंत्री व गडकरी यांच्या कानावर घातले. मुख्यमंत्री सुमारे अर्धा तास रेशीमबागेत होते. तर गडकरीदेखील तेवढाच वेळ संघ मुख्यालयात होते. या भेटीबाबतीत संघ मुख्यालयातून कुणीही प्रतिक्रिया दिली नाही.(प्रतिनिधी)राष्ट्रीय पातळीवर संघ पदाधिकाऱ्यांची उपस्थितीरेशीमबाग स्मृतिमंदिर येथे संघाचा अखिल भारतीय प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. दरवर्षी पाच दिवसांसाठी आयोजित होणाऱ्या या वर्गासाठी संघाचे जवळपास सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नागपुरात उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी सरसंघचालकांची भेट घेतली त्यावेळी सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे.नंदकुमार यांच्यासह इतर पदाधिकारीदेखीलउपस्थित होते. गडकरी यांनीदेखील संघ मुख्यालयात संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.