शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

गडकरी पंतप्रधान व्हावेत : सुलेखा कुंभारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:16 IST

नितीन गडकरी यांच्या रुपाने मराठी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्देभाजप-सेना युतीचा करणार प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नितीन गडकरी यांच्या रुपाने मराठी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली.२०१४ च्या निवडणुकीमध्ये बरिएमने भाजपला समर्थन केले. त्यांच्याकडून असलेल्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण झाल्या असून काही होत आहेत. आंबेडकरी जनतेची कधी नव्हे इतकी कामे गेल्या पाच वर्षात झाली. तथागत गौतम बुद्धांशी संबंधित देशातील महत्त्वाची स्थळे आपसात रस्ता मार्गाने जोडली जात आहेत. बुद्धिस्ट सर्किट तयार केले जात आहे. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभे राहत आहे. लंडन येथील डॉ. आंबेडकरांचे स्मारक आपल्या ताब्यात घेतले आहे. इतकेच नव्हे तर दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास केला जात आहे. यासोबतच दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोलीचा विकास करून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्यात येत आहे. ही सर्व कामे पहता या निवडणुकीतही बरिएमं भाजप-शिवसेना युतीला समर्थन जाहीर करीत त्यांच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. नितीन गडकरी यांनी तर देशभरात कामाचा झपाटा लावला आहे. ते गेल्या वेळी ३ लाख मतांनी निवडूनआले होते. यंदा ते पाच लाख मताच्या फरकांनी निवडून येतील. तसेच महाराष्ट्रात भाजप-सेना युतीच्या ४६ जागा येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला नगरसेविका वंदना भगत, अफजल अन्सारी, नंदा गोडघाटे, अशोक नगरारे, भीमराव फुसे आदी उपस्थित होते.नागपूर- विदर्भाचा झपाट्याने विकाससुलेखा कुंभारे म्हणाल्या, आजवर विदर्भात विकास कामे होत नसल्यामुळेच वेगळ्या विदर्भाची मागणी होत होती. परंतु गेल्या पाच वर्षात नागपूर व विदर्भाचा झपाट्याने विकास होत आहे. विशेषत: रस्त्यांच्या जाळ्यांमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. असे असले तरी वेगळ्या विदर्भ व्हावा, ही आपल्या पक्षाची मागणी कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSulekha Kumbhareसुलेखा कुंभारे