शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील संशोधकांना मिळाले नवे ‘व्हिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:18 IST

‘सीएसआयआर’अंतर्गत (कौन्सिल आॅफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) लागलेल्या विविध शोध तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ‘नीरी’त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे‘सीएसआयआर’ महाप्रदर्शनाचा समारोप : हजारो शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीएसआयआर’अंतर्गत (कौन्सिल आॅफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) लागलेल्या विविध शोध तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ‘नीरी’त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी या महाप्रदर्शनाचा समारोप झाला. तीन दिवसांत हजारो शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत सामान्य नागरिकांनीदेखील येथे भेट दिली. ‘सीएसआयआर’ व ‘नीरी’चे काम पाहून भविष्यातील संशोधकांना विज्ञानाकडे पाहण्याची नवीन प्रेरणाच मिळाली.‘सीएसआयआर’अंतर्गत येणाºया कृषी, पर्यावरण, रसायन आणि पेट्रोकेमिकल, पाणी, ऊर्जा, अभियांत्रिकी, जेनेरिक औषधे, अन्न व पोषण इत्यादी क्षेत्रात काम करणाºया संस्थांच्या कामगिरीवर येथे प्रकाश टाकण्यात आला होता. सोमवारी या महाप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तिन्ही दिवस मिळून साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या महाप्रदर्शनाला भेट दिली. अखेरच्या दिवशी सुटी असूनदेखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कुटुंबीयांसमवेत आले होते. याशिवाय काही शेतकºयांनीदेखील तंत्रज्ञानाबाबत जाणून घेतले. प्रदर्शनामध्ये जलशुद्धीकरणासाठी ‘हॉलो फायबर मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी’, सौरऊर्जेशी संबंधित तंत्रज्ञान, आॅटोमॅटीक युरिनल फ्लशर, प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती इत्यादी ‘मॉडेल’चे सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत वैज्ञानिकांनी त्यांच्याशी संवाद साधला. अनेक विद्यार्थ्यांनी तर स्वत:च्या डोक्यातील कल्पना येथे मांडल्या. काही विद्यार्थ्यांना ‘नीरी’ने सादरीकरणासाठी विशेष निमंत्रित केले आहे.अखेरच्या दिवशी पर्यावरणावर मार्गदर्शनबुधवारी विद्यार्थ्यांसाठी दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ‘नीरी’च्या वैज्ञानिक डॉ.शालिनी ध्यानी यांनी ‘शहरी संहार आणि पर्यावरणावर आधारित दृष्टिकोन’ या मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर डॉ.रिमा बिस्वास मंडल यांनी पृथ्वीवरील लहान जीवजंतू पर्यावरणाशी निगडित मोठमोठ्या समस्या सोडविण्यासाठी किती फायदेशीर ठरतात यावर प्रकाश टाकला.