शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टिप्परची अ‍ॅम्बुलन्सला धडक

By admin | Updated: September 28, 2015 03:08 IST

अपघातातील जखमी महिलेला नागपुरात उपचारासाठी आणणाऱ्या छिंदवाड्याच्या एका अ‍ॅम्बुलन्सला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली.

महिला ठार : पाच गंभीर जखमीनागपूर : अपघातातील जखमी महिलेला नागपुरात उपचारासाठी आणणाऱ्या छिंदवाड्याच्या एका अ‍ॅम्बुलन्सला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. त्यामुळे अ‍ॅम्बुलन्समधील एका महिलेचा करुण अंत झाला तर पाच जण जबर जखमी झाले. मानकापूर चौकात उड्डाणपुलाखाली रविवारी पहाटे ३.३० वाजता हा भीषण अपघात घडला. छिंदवाडा(मध्य प्रदेश)जवळच्या उमरेड गावातील सोनी कुटुंबातील एक महिला अपघातात जबर जखमी झाली होती. तिची प्रकृती बिघडत चालल्यामुळे तिला तिचे कुटुंबीय उपचारासाठी नागपुरात घेऊन येत होते. एका अ‍ॅम्बुलन्समधून(एमपी २८/ डीबी ०१६१) जखमी महिला आणि तिचे नातेवाईक रविवारी पहाटे ३.३० वाजता मानकापुरच्या उड्डाणपुलाखाली आले. त्याचवेळी वेगात आलेल्या १० चाकी टिप्पर(एमएच ३१/ सीबी ७९४१)च्या आरोपी चालकाने अ‍ॅम्बुलन्सला जोरदार धडक मारली. त्यामुळे विवेक विजय सोनी, विशाल सोनी, गायत्री सोनी, नंदू सोनी, रेणुका सोनी आणि मुन्नी नंदू सोनी हे सर्व गंभीर जखमी झाले. त्यांना बाजूच्या कुणाल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मुन्नी सोनी यांना मृत घोषित केले. एका जखमी महिलेला उपचारासाठी घेऊन येणारे सोनी कुटुंबातील पाच जण या अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांच्या गावातील १५ ते २० नातेवाईकांना आज येथे यावे लागले. दरम्यान, मानकापूर पोलिसांनी या अपघाताला दोषी असलेल्या टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)