शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बेकरीतल्या मोतीचूर लाडूमध्ये निघाली बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 10:24 IST

अजनी चौकस्थित अजित बेकरीतील मोतीचूरचे लाडू खाल्ल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलींची प्रकृती अस्वस्थ झाली.

ठळक मुद्दे दोन मुलींची प्रकृती अस्वस्थअजित बेकरीतील प्रकार अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी चौकस्थित अजित बेकरीतील मोतीचूरचे लाडू खाल्ल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलींची प्रकृती अस्वस्थ झाली. लाडू फोडून पाहिले असता लाडूच्या आत बुरशी आढळून आल्याने खळबळ उडाली. याची माहिती अजित बेकरीला दिली असता त्याने प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरीवर कारवाई व्हावी, या उद्देशाने सोमवारी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) लेखी तक्रार करण्यात आली आहे. लाडूचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.मंगेश गाकरे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी सोमवारी ‘लोकमत’ला येऊन आपबिती सांगितली. ते म्हणाले, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अजनी चौकातील अजित बेकरी येथून अर्धा किलो मोतीचूरचे लाडू विकत घेतले. घरी जात असताना सोबत असलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींनी काही लाडू खाल्ले. रात्री ९ वाजता दोघींचे पोट दुखू लागले. काही वेळाने उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तातडीने दोघींना इस्पितळात न्यावे लागले. दुसऱ्या दिवशी घरी लाडू फोडून पाहिले असता लाडूच्या आत बुरशी आढळून आली. याची माहिती अजित बेकरीला दिली.अजित बेकरीमधून एक सहायक व्यवस्थापक घरी आला, सोबत त्याने मिठाईचे पॅकेट आणले होते. त्याने हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. परंतु लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणाची तक्रार ‘एफडीए’कडे करणार असल्याचे सांगून त्याला हाकलून लावले. सोमवार २ डिसेंबर रोजी ‘एफडीए’कार्यालयात यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली; सोबतच बुरशी लागलेले लाडूचे नमुने प्रयोगशाळेत जमा केले. गाकरे म्हणाले, हा लोकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार आहे. बुरशीजन्य खाद्यपदार्थ खाल्ल्याने भविष्यात कधीही कोणताही रोग होऊ शकतो. अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते. यामुळे कायद्यानुसार अजित बेकरीवर कारवाई व्हावी, हीच मागणी आहे. यासंदर्भात अजित बेकरी येथे फोन लावून त्यांची बाजू जाणून घेतली असता, बेकरीचे मालक झोपले असल्याचे सहायक व्यवस्थापक क्षितिज यांनी सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा