शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उन्हामुळे वाढले फंगल इन्फेक्शनचे रुग्ण : नितीन बरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:15 IST

हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. अलीकडे त्वचा ‘फंगल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी घर्मग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा लाल व ओलसर होते. काही दिवसांनी बाजूला छोटे छोटे पांढरे दाणे येऊन ही बुरशी हळूहळू पसरत जाते. बुरशी येते त्या भागाची आग होते व तिथे कंड सुटतो. या आजारावर अनेक जण स्वत:हून औषधे घेतात. परिणामी, हा आजार बरा होण्यापेक्षा गंभीर रूप धारण करतो, अशी माहिती प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिली.

ठळक मुद्दे स्वत:हून औषधे न घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. अलीकडे त्वचा ‘फंगल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी घर्मग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा लाल व ओलसर होते. काही दिवसांनी बाजूला छोटे छोटे पांढरे दाणे येऊन ही बुरशी हळूहळू पसरत जाते. बुरशी येते त्या भागाची आग होते व तिथे कंड सुटतो. या आजारावर अनेक जण स्वत:हून औषधे घेतात. परिणामी, हा आजार बरा होण्यापेक्षा गंभीर रूप धारण करतो, अशी माहिती प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिली.डॉ. बरडे म्हणाले, आपल्या शरीराचा सर्वात मोठा भाग त्वचा आहे. परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या शहराचे तापमान ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. यामुळे घामाच्या धाराने नागपूरवासी त्रस्त आहेत. या घामामुळे त्वचेचे ‘फंगल इन्फेक्शन’ म्हणजे बुरशीजन्य संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत. अनेक रुग्ण यावर डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध विक्रेत्यांकडून औषधे घेतात. यामुळे त्यांच्या हातात ‘स्टेरॉईड्स’युक्त क्रीम्स पडते. या क्रीम्समुळे काही दिवसांसाठी आराम पडतो. परंतु नंतर पुन्हा पुन्हा हा आजार उफाळून येतो. ‘फंगल इन्फेक्शन’ होऊ नये म्हणून या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घामोळ्या आल्यास दोनदा अंघोळ कराया दिवसांमध्ये घामामुळे घर्मग्रंथींची छिद्रे बुजल्याने त्वचेवर लाल बारीक पुरळ उठतात. सामान्य भाषेत याला घामोळ्या म्हणतात. काही व्यक्तींना घामोळ्या चटकन येतात. घामोळ्या आल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याने अंघोळ करावी. पातळ सुती कपड्याचा वापर करावा. मोकळ्या हवेत पंख्याखाली अधिक वेळ बसावे, असा सल्ला डॉ. बरडे यांनी दिला.नायटाकडेही दुर्लक्ष नकोपावसाळ्यामध्ये बुरशीचा दुसरा प्रकार नायटा म्हणजे ‘रिंगवर्म’चे रुग्ण सर्वात जास्त दिसून येत असले तरी या दिवसातही काही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यात त्वचेवर कोरडे गोलसर चट्टे उठतात. त्यांना खूप खाज येते. हा प्रकारही जांघ, काख, पार्श्वभाग यावर येतो. हळूहळू पसरत जातो. नायट्याचा प्रादुर्भाव नखांनाही होऊ शकतो.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलdoctorडॉक्टर