शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटीवर निधी परत जाणार!

By admin | Updated: February 2, 2016 02:39 IST

गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलला उपकरणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) तीन कोटींचा निधी मिळाला होता.

मेडिकल : आवश्यक उपकरणे खरेदीसाठी मिळाला आहे निधीनागपूर : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलला उपकरणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) तीन कोटींचा निधी मिळाला होता. परंतु लालफितीशाहीमुळे आतापर्यंत केवळ ९६ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. उर्वरित निधीतून उपकरण खरेदीची आॅर्डरच निघाली नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. चकचकीत खासगी इस्पितळांमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी आरोग्य सेवेचे सबलीकरण करणे, त्यांची विश्वासार्हता वाढवणे, अद्यावत उपकरण देणे, त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. सरकार आपल्यापरीने तसे प्रयत्नही करते. परंतु लालफितशाहीमुळे यावर पाणी फेरले जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुविधा, साधने यांची भीषण कमतरता आहे. परंतु अधिष्ठात्यांना खरेदीची मर्यादा असल्याने उपकरण खरेदीमध्ये उशीर होत असल्याचे चित्र आहे. सध्याच्या स्थितीत अधिष्ठात्यांना तीन लाखांपर्यंत उपकरणे खरेदीचा अधिकार आहे. १० लाख रुपयांपर्यंतच्या अधिकार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांंना तर त्यावरील खर्चाचे अधिकार मंत्रालयाला देण्यात आले आहे. परंतु आवश्यक महागडी उपकरणे दहा लाखांच्यावरची राहत असल्याने मंत्रालयात खरेदीचा प्रस्ताव महिनोंमहिने पडून राहतो. रुग्णालय प्रशासनाकडून याचा वेळोवळी पाठपुरावा केला जात असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. यामुळेच की काय मागील वर्षीसुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘डीपीसी’मधून मिळालेला तीन कोटींचा निधी खर्चच न होता परत गेला. २०१४-१५च्या खरेदीसाठी पुन्हा तीन कोटींचा निधी ‘डीपीसी’मधून मिळाला. या निधीत बसेल तेवढ्या सर्व उपकरणांच्या खरेदीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. प्रशासकीय मंजुरीही मिळाली. यातील ९६ लाखांच्या उपकरणांची खरेदी सुद्धा झाली. परंतु दहा लाखांवरील उपकरणांच्या खरेदीचे अद्यापही आॅर्डरच निघाली नसल्याने साधारण दोन कोटी चार लाख रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्षनुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत: मेयो, मेडिकलमध्ये येणाऱ्या समस्यांना गंभीरतेने घेऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. यात अधिष्ठात्यांचे अधिकार वाढवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. परंतु सूचनांचे पालन न झाल्याने अनेक महत्त्वाच्या उपकरणांच्या खरेदीचे प्रस्ताव व औषध बिलांची देयके प्रलंबित पडून असल्याची माहिती आहे.दोन अ‍ॅम्ब्युलन्ससह उपकरणांची खरेदी पडली मागे दोन कोटी चार लाख रुपयांच्या खरेदीत अनेक महत्त्वाच्या उपकरणांचा समावेश आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार २६ लाख रुपयांच्या दोन रुग्णवाहिका (अ‍ॅम्ब्युलन्स), बधिरीकरण विभागातील महत्त्वाचे उपकरणे, शस्त्रक्रिया गृहातील एलईडी बल्ब, एण्डोस्कोप, शस्त्रक्रिया टेबल यांसह इतरही महत्त्वाची उपकरणे आहेत. याला प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी खरेदी आॅर्डर न निघाल्याने मार्च महिन्यापूर्वी त्याची खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.