शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेसाठी एप्रिलमध्ये निधी

By admin | Updated: October 15, 2015 03:14 IST

जर्मनीची केएफडब्ल्यू बँक आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) यांच्यात कर्जवाटप करार फेब्रुवारी २०१६ मध्ये ...

जर्मन केएफडब्ल्यू बँकेचे संकेत : पुढील आठवड्यात अहवाल सादर करणारनागपूर : जर्मनीची केएफडब्ल्यू बँक आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) यांच्यात कर्जवाटप करार फेब्रुवारी २०१६ मध्ये होणार असून प्रकल्पाच्या उभारणीसाठी एप्रिलपासून टप्प्याटप्याने निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती बँकेच्या चमूचे प्रमुख फेलिक्स क्लोडा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी बँकेच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाचे अधिकारी पीटर हिलिगेस आणि ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मनपा आयुक्तांशी चर्चाक्लोडा म्हणाले, सोमवारपासून पाच दिवसीय दौऱ्यावर आहोत. तीन दिवसात प्रकल्पाची पाहणी केली. मंगळवारी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी फिडर सर्व्हिस, बससेवेसह विविध बाबींवर झालेली चर्चा सकारात्मक होती. कामे याच वेगाने सुरू राहली तर मार्च-एप्रिलपासून ३७०० कोटी रूपये आवश्यकतेनुसार कंपनीला देण्यात येईल. क्लोडा म्हणाले, नागपुरात वाहतूक समस्या आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून किफायत दरात वेगवान आणि प्रदूषणरहित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाला अर्थपुरवठा करण्यासाठी केएफडब्ल्यू बँक पुढे आली आहे. निविदा प्रक्रिया जारी आहे. कार्याचा वेग पाहून चमूतील सर्व सदस्य प्रभावित झाले आहेत. मंत्रालयात शुक्रवारी चर्चाकेएफडब्ल्यू बँकेचे अधिकारी प्रकल्प पाहून प्रभावित झाले आहेत. या प्रकल्पासाठी जर्मनीचे सहकार्य मिळत आहे. यावेळी प्रकल्पाचे टप्पे आणि कर्ज मंजुरीवर चर्चा झाली. ही चमू शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात शहरी विकास आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. व्याजदरावर अधिकाऱ्यांचे मौनक्लोडा यांनी नागपूर मेट्रो रेल्वेच्या कार्याच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले. या प्रकल्पासाठी कर्ज देण्यास बँक तयार आहे. दौऱ्याचा अहवाल पुढीलआठवड्यात बँकेच्या संचालकांसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतरच कर्जाला अंतिम स्वरूप मिळेल. २० वर्ष मुदतीच्या कर्जासाठी आकारण्यात येणाऱ्या व्याजदरावर त्यांनी मौन पाळले.पीटर हिलीगेस यांचे शिक्षण नागपुरात!चमूत सहभागी पीटर हिलीगेस केएफडब्ल्यू बँकेच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात संचालक पदावर कार्यरत आहेत. ‘गेस्ट स्टुडंट’ म्हणून १९९१ मध्ये नागपूर विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. त्यांना या शहराची ओळख आहे. तेव्हाच्या आणि आताच्या नागपुरात बराच बदल झाला असून प्रकल्पाच्या विकास कामांवर समाधानी असल्याचे ते म्हणाले.