शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

अल्पसंख्यांकबहुल वस्त्यांसाठी मिळणाऱ्या विकास निधीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:07 IST

राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेत नागपूर जिल्हा प्रशासनाला यावर्षी मनपा प्रशासनाकडून एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनातील नगरपालिका शाखा विभागानुसार दरवर्षी प्रस्तावच नसल्याने अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेच्या निधीही कमी कमी होत चालला आहे.

ठळक मुद्दे२०१९-२० मध्ये मनपाकडून एकही प्रस्ताव नाही

रियाज अहमद।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकांतर्गत शहरात अनेक अल्पसंख्यांकबहुल वस्त्या आहेत. येथे विकास कामांची आवश्यकताही आहे. परंतु शहरातील अल्पसंख्यांकबहुल वस्त्यांमधील विकासाला पाहिजे तसे प्राधान्य दिले जात नसून या विकास निधीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेत नागपूर जिल्हा प्रशासनाला यावर्षी मनपा प्रशासनाकडून एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनातील नगरपालिका शाखा विभागानुसार दरवर्षी प्रस्तावच नसल्याने अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेच्या निधीही कमी कमी होत चालला आहे.नगरपालिका विभागानुसार अल्पसंख्यांक परिसरातील विकास कामांसाठी वर्ष २०१९-२० साठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. परंतु मनपा क्षेत्रात येणाऱ्या अल्पसंख्यांकबहुल लोकसंख्येच्या वस्त्यांसाठी मनपाकडून एकही प्रस्ताव आलेला नाही.राज्य सरकारने पूर्व नागपुरातील जैन मंदिरजवळ सिमेंट रोडसाठी २५ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. परंतु हा प्रस्ताव मनपाकडून आलेला नव्हता. याशिवाय नगर परिषद व पंचायतमध्ये चार प्रस्ताव आलेत. ते मंजूरही झाले. यात सावनेर, उमरेड, भिवापूर, कुही यांचा समावेश आहे. राज्य सरकारने प्रस्ताव स्वीकारण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च जाहीर केली आहे.पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीअल्पसंख्यांकक्षेत्र विकास योजनेंतर्गत १० ते २० लाख रुपयाच्या निधीची तरतूद आहे. आवश्यकता लक्षात घेऊन निधी वाढवूनसुद्धा मिळतो. यातून कब्रस्तान, स्मशान भूमीतील विकास कामे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, वीज पुरवठा, रस्ते, स्ट्रीट लाईट, दूषित पाण्याची समस्या सोडविण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी, बालवाडी, समाजभवन, ईदगाह आदी कामे केली जातात.नगरसेवकांची उदासीनता जबाबदारशहरात वांजरा, पिवळी नदी, टेका नई बस्ती, ताजाबाद, हसनबाग, कळमना, जाफरनगर, मोमिनपुरा आदींसह चारही बाजूंनी अल्पसंख्यांकबहुल वस्त्या आहेत. या वस्त्यांना विकास कामांची नितांत आवश्यकता आहे, असे असतानाही प्रस्ताव पाठवले जात नसतील तर ही त्या वस्त्यांमधील नगरसेवकांची उदासिनताच म्हणावी लागेल.कमी होताहेत प्रस्तावप्रस्तावानुसारच निधी मंजूर केला जातो. परंतु अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेसाठी येणाऱ्या प्रस्तावांची संख्या कमी होत आहे. यावेळी शहरासाठी मनपाकडून एकही प्रस्ताव आलेला नाही. जिल्हा प्रशासन आलेले प्रस्ताव वेळेवर सरकारकडे पाठवते.- हरिश्चंद्र टाकरखेडे,जिल्हा प्रशासन अधिकारी

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका