शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य माहिती आयोगाचे कामकाज आता ‘ई-मेल’द्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:01 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्य माहिती आयोगाने आता ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्य माहिती आयोगाने आता ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. जर अर्जदारांनी सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती २० रुपयांचे स्टॅम्प लावून पाठविल्या तर तत्काळ सुनावणी आयोजित करण्याची व्यवस्था आयोगातर्फे करण्यात आली आहे.‘लॉकडाऊन’मुळे राज्य माहिती आयोग नागपूर कार्यालयाचे कामकाज २४ मार्चपासून बंद करण्यात आले होते. दर महिन्याला या कार्यालयात केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमांचे कलम १९(३) च्या तरतुदींनुसार अंदाजे साडेतीनशेच्या जवळपास द्वितीय अपील अर्ज व कलम १८ नुसार माहितीसंबंधी तक्रारी व त्याअनुषंगाने इतरही टपाल दाखल होतात. पोस्टाचे व्यवहार बंद असल्याने कार्यालयात अत्यल्प प्रमाणात टपाल प्राप्त होत आहे. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांना कार्यालयात येणे शक्य नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.अंतरावरून अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून अपीलार्थी व तक्रारदार यांच्या अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत आहेत. तसेच सविस्तर खुलासेदेखील मागविण्यात येत आहेत. अनेक अपीलार्थी व तक्रारदार यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अर्जांवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच सर्व अपीलार्थी व तक्रारदार यांना ई-मेलवर नोटीस देणे, गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून त्यांना व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून ऐकून घेणे, श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून ऐकून घेण्यासाठी मोठी अडचण भासत होती. त्या पार्श्वभूमीवर कामकाज सुलभ करण्यासाठी आयोगाने ई-मेलद्वारे कामकाजाचा निर्णय घेतला असल्याचे राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार