शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसाठी हालचाली जोरात

By admin | Updated: October 23, 2014 00:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दिवाळी आटोपल्यानंतर पुढील आठवड्यात २७ तारखेला विद्वत परिषद व व्यवस्थापन

नागपूर विद्यापीठ : २७ तारखेला विद्वत व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दिवाळी आटोपल्यानंतर पुढील आठवड्यात २७ तारखेला विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा होणार आहे. कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची शिफारस करण्यात येईल. याच कालावधीत कुलगुरू पदासाठी जाहिरातदेखील प्रकाशित होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.२५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ.विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. १०० वा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विनायक देशपांडे यांना देण्यात आली. परंतु पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास विलंब का होत आहे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. निवडप्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून विद्यापीठातील विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा २७ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आली आहे. यातून कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची शिफारस करण्यात येणार आहे. हा सदस्य आपल्याच गटातील असावा यासाठी विद्यापीठात जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विद्यापीठाच्या राजकारणात बदलते ‘रंग’ पहायला मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)