शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

फुके यांचा पटोलेंवर ट्विटर हल्ला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:08 IST

नागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ...

नागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यांनी दोन्ही नेत्यांवरील आपला ‘भक्ती’भाव दाखवीत पटोले यांच्यावर ट्विटरवर हल्ला चढविला आहे. पटोले यांची टीका ही विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी असल्याचा प्रहार फुके यांनी केला आहे.

पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर नटसम्राट अशी तर तर देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हुकूमशाही होता, अशी बोचरी टीका केली होती. ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली. फडणवीस यांना विदर्भात रोखण्यासाठी पटोले यांच्या हाती काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली, अशी राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. आता पटोले यांना गुंतवून ठेवण्यासाठी ते ज्या साकोली विधानसभा मतदारसंघातून येतात तेथून गेल्यावेळी भाजपकडून लढलेले आ. परिणय फुके यांना समोर करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत फुके यांचा पटोले यांनी पराभव केला होता. मात्र ही निवडणूक दोन्ही नेत्यांतील संघर्षाने चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे पटोले हे भाजपमध्ये असताना गोंदिया- भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत फुके यांना विजयी करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. मात्र, पटोलेंनी नंतर पक्ष बदलला आणि या दोन्ही नेत्यांमधील संबंधही तुटेपर्यंत ताणले गेले. पटोले यांनी भाजप नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपले घर दुरुस्त करावे, त्यांच्या निवडीने नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांची आधी समजूत काढावी, असा डिवचणारा सल्लाही फुके यांनी दिला आहे. तर, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले हे येत्या काळात भंडारा- गोंदियात शक्तिप्रदर्शन करून गृहजिल्ह्यात भाजपवर अधिक दबाव निर्माण करण्याच्या बेतात आहेत.