शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांच्या घरावर मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:44 IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढण्यात आला.

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढण्यात आला. समितीचे नेते ज्येष्ठ माजी आमदार वामनराव चटप यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा अर्धा किलोमीटर गेल्यानंतर गांधी चौकात पोलिसांनी अडविला. पोलिसांच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘भाजपा..., तुला विदर्भावर भरोसा नाही का’, असा सवाल करीत सरकार व भाजपा नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.इतवारीतील विदर्भ चंडिका मातेच्या मंदिरात आरती करून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनात भजन, लोकगीत, आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न झाला. क्रांतिदिनी ‘भाजप सरकार चले जावो’ असा नाराही चटप यांनी दिला. मोर्चाला अपेक्षेप्रमाणे खूपच कमी प्रतिसाद मिळाला.मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे-पाटील, समितीचे संयोजक राम नेवले, माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर, रिपाइंचे आनंदराव बागडे आदीं सहभागी झाले होते.२८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारात विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची हमी देण्यात आली होती. मात्र, हा करार पूर्णपणे कुचकामी ठरला आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी विदर्भभरात या कराराची होळी केली जाईल. - वामनराव चटप, ज्येष्ठ नेते, विदर्भ आंदोलन समिती.