शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील क्लीपमुळे मित्र बनले शत्रू

By admin | Updated: March 20, 2017 01:59 IST

आक्षेपार्ह संबंधाची अश्लील क्लीप तयार करणाऱ्या मित्राच्या गळ्यात फास टाकून त्याची हत्या करण्याचा दोघांनी प्रयत्न केला.

गळ्यात फास टाकून हत्येचा प्रयत्न नागपूर : आक्षेपार्ह संबंधाची अश्लील क्लीप तयार करणाऱ्या मित्राच्या गळ्यात फास टाकून त्याची हत्या करण्याचा दोघांनी प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत अनिरुद्ध रोशन पाटील (वय २५) याने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. गुरुवारी १६ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. यासिन मोहम्मद शेख (वय ३६) आणि शुभम किशोर जवादे (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. अनिरुद्ध आणि यासिन हे दोघे मॉडेल मिल चाळ, गणेशपेठमध्ये राहतात तर, शुभम इमामवाड्यात राहतो. हे तिघेही मित्र आहे. दिवसातील बराच वेळ ते सोबत राहतात. सोबतच फिरायला जातात. यासिन आणि शुभम या दोघांमध्ये आक्षेपार्ह संबंध असल्याचा अनिरुद्धला संशय आला. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी लपून या दोघांच्या संबंधाची आपल्या मोबाईलमध्ये अश्लील क्लीप बनविली. त्याची माहिती कळताच यासिन क्लीप मागू लागला. अनिरुद्धने नकार दिल्यामुळे दोघांचे धाबे दणाणले. ही क्लीप व्हायरल झाल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी भीती वाटल्यामुळे आरोपी यासिन आणि शुभमने अनिरुद्धला संपविण्याचा कट रचला. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता हे दोघे बुलेट घेऊन अनिरुद्धच्या घरी आले. फिरायला जाऊ असे सांगून त्याला सोबत घेतले. मानेवाड्यातून भिसी मार्गाने ते जात असताना निर्जन ठिकाणी आरोपींनी अनिरुद्धच्या गळ्यात दोराचा फास टाकून गळा आवळण्याचे प्रयत्न केले. मात्र, आरोपींचा कुटील हेतू लक्षात येताच अनिरुद्धने बुलेट थांबवायला लावून प्रतिकार करीत पळ काढला. या प्रकरणाची तक्रार आधी ग्रामीण पोलिसांकडे व नंतर गणेशपेठ ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी) अटक आणि पीसीआर घटनेच्या दिवशी आरोपी शुभम बुलेट चालवित होता. मध्ये अनिरुद्धला बसवून यासिन त्याच्या मागे बसला. अंधारात निर्जन ठिकाणी जाताच मागे बसलेला यासिन शुभमच्या गळ्यात दोराचा फास टाकण्याचा प्रयत्न करू लागला. दोन तीन वेळा त्याने हा प्रयत्न केला. जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच लघुशंकेचा बहाणा करून अनिरुद्धने शुभमला बुलेट थांबवण्यास सांगितले. बुलेटवरून खाली उतरताच आरोपी यासिन त्याच्या मागे आला. तो मागून पकडणार हे लक्षात येताच अनिरुद्धने त्याच्या गुप्तांगावर जोरात लाथ हाणली. वेदनांनी ओरडत तो खाली बसताच अनिरुद्धने तेथून धूम ठोकली. अनोळखी वाहनचालकाच्या मदतीने त्याने नागपूर गाठले. दोन दिवस विचार केल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. दरम्यान, शनिवारी रात्री पोलिसांनी दोघांनाही अटक करून रविवारी कोर्टात हजर केले. त्यांना कोर्टाने दोन दिवस पीसीआर मंजूर केला.