बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला. तरुणाईचा ‘डे’ असला की फुटाळा तलाव ‘हाऊसफुल्ल’ होतो. उत्साह ओसंडून वाहतो. असेच चित्र फुटाळा चौपाटीवर दिसले. मैत्रीदिनानिमित्त हा परिसर अधिकच ‘तरुण’ झाला होता. फुटाळा चौपाटीवर सकाळपासून गर्दी होती. तलावाच्या भिंत, पार्किंग आणि नो पार्किंगच्या जागेवर उभ्या केलेल्या मोटरसायकलवर बसून तरुणांचा घोळका दिसून येत होता. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांनीदेखील मैत्रीदिनाचा आनंद साजरा केला. -वृत्त/पान २
बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला.
By admin | Updated: August 3, 2015 02:35 IST