शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे वारंवार माहेरी जाणे ठरले घटस्फोटाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:16 IST

पतीसोबत सतत या-ना-त्या कारणावरून भांडण करणे व पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवणे या गोष्टी पतीला मनस्ताप देणारी आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून या कारणावरून पतीला मिळालेला घटस्फोट योग्य ठरवला आहे.

ठळक मुद्देपतीला मनस्ताप देणारी कृतीसतत भांडण करणेही चुकले

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पतीला न सांगता, न विचारता पत्नीचे वारंवार माहेरी जाणे आणि तेथे महिनोमहिने राहणे, पतीसोबत सतत या-ना-त्या कारणावरून भांडण करणे व पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवणे या गोष्टी घटस्फोटाचे कारण ठरल्या आहेत. ही कृती पतीला मनस्ताप देणारी आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून या कारणावरून पतीला मिळालेला घटस्फोट योग्य ठरवला आहे.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला आहे. नागपुरातील लुर्दमॅरी व जॉनी (बदललेली नावे) यांचे २४ ऑक्टोबर २००७ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर लुर्दमॅरी संयुक्त कुटुंबात काही महिने राहिली, पण पुढे चालून ती पतीला न सांगता वारंवार माहेरी जायला लागली. तिची संयुक्त कुटुंबात राहण्याची इच्छा नव्हती. जॉनी तिला प्रत्येकवेळी सासरी परत आणत होता. दरम्यान, तिने पोलीस ठाण्यात छळाची तक्रार नोंदवली. महिला सेलच्या मध्यस्थीमुळे तो वाद मिटला. मुलाचा जन्म झाल्यानंतर लुर्दमॅरी सासरी येण्यास तयार नव्हती. जॉनीने कायदेशीर नोटीस बजावल्यामुळे ती परत आली.

तिची संयुक्त कुटुंबात राहण्याची इच्छा नसल्यामुळे जॉनीने भाड्याचे घर घेतले होते. परंतु, तेथेही लुर्दमॅरी समाधानाने राहिली नाही. ती सतत भांडण करून जॉनीला मानसिक व शारीरिक त्रास देत होती. परिणामी, जॉनीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २ मे २०१७ रोजी ती याचिका मंजूर झाली. त्या निर्णयाविरुद्ध लुर्दमॅरीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने लुर्दमॅरीची वागणूक मनस्ताप देणारी असल्याचे स्पष्ट करून ते अपील फेटाळून लावले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालय