शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील १४०० कर्मचाऱ्यांची पदे गोठवा

By admin | Updated: June 23, 2017 02:19 IST

१९८० च्या दशकात भारतीय रेल्वेत एकूण २२ लाख रेल्वे कर्मचारी होते. परंतु मागील ३० वर्षांत रेल्वेगाड्यांची संख्या दहापटीने

रेल्वे बोर्डाचे निर्देश : खासगीकरणामुळे कर्मचारी ठरताहेत अतिरिक्तदयानंद पाईकराव । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९८० च्या दशकात भारतीय रेल्वेत एकूण २२ लाख रेल्वे कर्मचारी होते. परंतु मागील ३० वर्षांत रेल्वेगाड्यांची संख्या दहापटीने वाढूनही रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या १२ लाखांवर आली आहे. खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेतील एक हजार आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील ४०० पदे गोठविण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश झोनस्तरावर येऊन ठेपला आहे. अशा पद्धतीने रेल्वे कर्मचाऱ्यांची पदे गोठविल्यास ही बाब रेल्वेसाठी घातक ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.भारतीय रेल्वेत खासगीकरणावर भर देण्यात येत आहे. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात येत आहेत. पूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर १८ आरक्षणाच्या तिकिटाचे काऊंटर होते. हे काऊंटर आता नऊवर आले आहेत. दिवसेंदिवस खासगीकरणाचे धोरण अवलंबण्यात येत असल्यामुळे कामाचा ताण वाढून कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. खासगीकरणामुळे प्रवाशांच्या समस्या वाढून त्याचा रेल्वेगाड्यांच्या संचालनावर विपरीत परिणाम होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सफाईचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदारांकडून सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्यामुळे त्याचा रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेवर परिणाम होतो. परंतु कर्मचारी कमी करण्याच्या नादात रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नुकतेच रेल्वे बोर्डाने विविध झोनमधील अतिरिक्तकर्मचारी गोठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील एक हजार कर्मचारी आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील ४०० कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत. खासगीकरणामुळे प्रवाशांना सुविधांऐवजी मनस्तापच होत आहे. रेल्वेने पेंट्रीकारचा ताबा कंत्राटदारांना दिला आहे. परंतु संबंधित कंत्राटदारांकडून प्रवाशांना निकृष्ट भोजनाचा पुरवठा होत असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच प्रवासी गोंधळ घालताना दिसतात. ही बाब केवळ खासगीकरणामुळे होत असून रेल्वे प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.रेल्वेत एखादा अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाला की त्याचे पद गोठविण्यात येते. सुरक्षेला धारेवर धरून हे काम होत असल्यामुळे त्याचा मोठा धोका देशाला पत्करावा लागणार आहे. अपेक्षेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत आहेत. ही बाब रेल्वेच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी कर्मचाऱ्यांची जागा भरून निघू शकत नाही. -प्रवीण डबली, माजी सदस्य, झेडआरयूसीसी, दपूम रेल्वे