शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच असले पाहिजे

By admin | Updated: September 9, 2015 03:13 IST

वृत्तपत्र माध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा आणि महत्त्वाचा स्तंभ आहे. समाज निकोप करण्यासाठी आणि भ्रष्ट व्यवस्थेचे बुरखे फाडण्याचे तसेच सत्य स्थिती समोर ....

प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे चेअरमन सी. के. प्रसाद यांच्याशी संवाद नागपूर : वृत्तपत्र माध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा आणि महत्त्वाचा स्तंभ आहे. समाज निकोप करण्यासाठी आणि भ्रष्ट व्यवस्थेचे बुरखे फाडण्याचे तसेच सत्य स्थिती समोर आणण्याचे काम पत्रकार करीत असतात. त्यामुळेच पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच असले पाहिजे, यावर आमचा विश्वास असून त्यासाठी ‘प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया’ काम करीत आहे, असे मत प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे चेअरमन निवृत्त न्या. सी. के. प्रसाद यांनी व्यक्तकेले. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने त्यांच्याशी संवादाचे आयोजन टिळक पत्रकार भवन, धंतोली येथे करण्यात आले. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कौन्सिल पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी झटते. पण पत्रकारांच्या अभिव्यक्तीला नियंत्रित करण्याचे काम कौन्सिलचे नाही. वृत्तपत्रातील एका व्यंगचित्रकाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने पत्रकारांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलीत. समाजात शिस्त राहावी म्हणून न्यायालयाने ही नियमावली दिल्यानंतर त्याचे अनुसरण व्हायला हवे. न्यायालयाने नियमावली तयार केल्यानंतर राज्य शासन वृत्तपत्रांसाठी नियमावली तयार करीत असेल तर ते योग्य नाही. ‘प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया’ म्हणजे केवळ कागदी वाघ झाला आहे, त्याचा पत्रकारांना उपयोग होत नाही, अशी टीका केली जाते. यावर न्या. प्रसाद म्हणाले, कौन्सिलला काही नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहेत. पण सध्या या क्षेत्रात कुणीही स्वत:ला पत्रकार म्हणवतो. पत्रकारांसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, पात्र पत्रकारांची नोंदणी असली पाहिजे आणि त्यांची जबाबदारी निश्चित असली पाहिजे. त्यानंतरच काही कारवाई करता येणे शक्य आहे. लेखक, शिक्षक, व्यापारीही सध्या अर्धवेळ पत्रकारिता करून स्वत:ला पत्रकार म्हणवतात म्हणून काही अडचणी आहेत. सध्या पत्रकारितेत कंत्राटी पद्धतच लागू करण्यात आली असली तरी, हा त्या संबंधित वृत्तपत्रांच्या मालकांचा भाग आहे. कौन्सिलची भूमिका मात्र सर्व पत्रकारांना वेज बोर्डाप्रमाणे नियमित नोकरीत करण्याची आहे. राज्य शासनाकडेही कौन्सिलने तसे मत नोंदविले आहे. यात प्रिंंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचाही समावेश आहे. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यात कौन्सिल ढवळाढवळ करीत नाही, असे ते म्हणाले. याप्रसंगी टिळक पत्रकार भवनाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी, अनुपम सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)