शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच हवे

By admin | Updated: June 28, 2015 03:09 IST

एखादी बाब श्लील किंवा अश्लील ठरविली जाते. व्यक्तिपरत्वे आणि संस्कृतीसापेक्षतेने या व्याख्या जगभरात बदलत जातात.

चर्चेतील सहभागींचा सूर : वाङ्मयातील श्लील-अश्लील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नागपूर : एखादी बाब श्लील किंवा अश्लील ठरविली जाते. व्यक्तिपरत्वे आणि संस्कृतीसापेक्षतेने या व्याख्या जगभरात बदलत जातात. लेखकाला राज्यघटनेने स्वातंत्र्य दिले, पण ते मर्यादित स्वरूपाचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालता येत नाही. मर्यादा घालण्यात अर्थही नाही. हा विषय आणि ही चर्चा खूप जुनी आहे, पण त्यावर निश्चित उपाय निघत नाहीत. कुणी काय आणि कसे लिहावे हा त्याच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याचे स्वातंत्र्य मान्य करून ते स्वीकारण्याचे वा नाकारण्याचे स्वातंत्र्य रसिकांना आहेच. त्यामुळे कुणाच्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे योग्य नाही, असा सूर चर्चेतल्या मान्यवर वक्त्यांनी शनिवारी मांडला. गिरीश गांधी प्रतिष्ठान आणि नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने ‘वाङ्मयातील श्लील-अश्लील आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ विषयावर टोकदार चर्चेचे आयोजन शंकरराव देव स्मृती सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी श्लील-अश्लील साहित्य, संस्कृती आणि भावना आदींबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निशिकांत मिरजकर होते. याप्रसंगी डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अनिल नितनवरे, ज्ञानेश वाकुडकर, कोमल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी डॉ. मिरजकर यांनी विषयाची मांडणी आणि चर्चेची दिशा ठरवून दिली. मर्ढेकरांना अश्लीलतेचा लढा द्यावा लागला आणि कालिदासाच्या कुमारसंभवमवरही टीका झाली. घटनेने देण्यात आलेले स्वातंत्र्य राजकीय आहे. पण कलावंताला त्याची अभिव्यक्ती करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वात्सायनाचे कामसूत्र, भृतुहरीचे शृंगारशतक, खजुराहोची लेणी, द्रौपदी वस्त्रहरण, रामायण, महाभारत, लेखिका तस्लिमा नसरीन आणि चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्यावर टाकण्यात आलेला बहिष्कार तसेच आपल्या संस्कृतीतील पुराण, उपनिषदांमधील वर्णने आणि तथाकथित संस्कृतिरक्षक म्हणवून घेणाऱ्यांची दांभिकता याबाबतही रोखठोक मते नोंदविण्यात आली. प्रत्यक्ष शब्दापेक्षा त्यातला हेतू समजून घेणे गरजेचे आहे. आधुनिकता आणि नवता आम्ही मान्य करीत असू तर निर्मितीच्या मागे असलेली श्लील-अश्लीलता वेगवेगळ्या अंगाने समजून घेण्याच्या आपल्या क्षमता विकसित कराव्या लागतील.यातल्या विकृतींचे समर्थन नाही. काहींनी अश्लील बाजू संयत आणि सूचकपणेही मांडता येत असेल तर त्यातला भडकपणा टाळावा, असे मत मांडले. याप्रसंगी देवयानी चव्हाण, डॉ. संध्या अमृते, सुरुची डबीर, डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. शुभांगी परांजपे, सीमाताई साखरे, कल्पना माळोदे, अमृता इंदूरकर, सुहासिनी साखरे, श्याम माधव धोंड, उल्हास मनोहर, दिवाकर मोहनी, सुनीती देव, मदन कुळकर्णी, श्यामकांत कुळकर्णी, रमेश बोरकुटे आदींनी मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)