शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र रखडलेलेच !

By admin | Updated: July 21, 2016 23:32 IST

कृषी विद्यापीठाने पाठवलेला प्रस्ताव, एमसीईएआरने पारित केला मात्र शासन दरबारी दुर्लक्ष.

अकोला: विदर्भातील शापित खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषद (एमसीईएआर) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) पाठवलेला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने त्यांच्या सभेत हा प्रस्ताव (एमसीईएआर) पारित करू न राज्य शासनाला सादर केला आहे. विदर्भातील शेतकर्‍यांसाठी मैलाचा दगड ठरणारे संशोधन केंद्र मात्र शासन दरबारी रखडले आहे. या पावसाळी अधिवेशनात हे संशोधन केंद्र मिळेल का, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.पश्‍चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील १६ तालुक्यांतील ८९२ गावे या खारपाणपट्टय़ात येतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र आहे. इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्यांचा आत आहे. या खारपाणपट्टय़ातील माती चोपण असून, भूजल खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषिमाल उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम तर होतोच, मानवी आरोग्याला हे पाणी घातक असल्याने वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या एकूण सामाजिक व आर्थिक स्तरावर झालेला आहे. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्टय़ावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव एमसीईएआर व आयसीएआरकडे पाठविलेला आहे. एमसीईएआरच्या सभेत स्वतंत्र खारपाणपट्टय़ाचा प्रस्ताव परित करण्यात येऊन राज्य शासनाला सादर करण्यात आला; परंतु राज्य शासनाने अद्याप लक्ष घातले नाही. या पावसाळी अधिवेशनात खारपाणपट्टा स्वतंत्र संशोधन केंद्राला मान्यता मिळावी याकरिता या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

*** कृषी विद्यापीठाने पाठवलेला खारपाणपट्टा स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने पारित करू न शासनाकडे पाठवलेला आहे. खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी संशोधन केंद्र मागितले आहे.- डॉ. डी. एम.मानकर,संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.