शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 21:50 IST

कॅब सर्व्हिस सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची वाहने भाड्याने घेऊन त्यांची रक्कम थकविल्या प्रकरणी सदर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देरक्कम थकवली : कुक टॅक्सी सर्व्हिसेस विरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅब सर्व्हिस सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची वाहने भाड्याने घेऊन त्यांची रक्कम थकविल्या प्रकरणी सदर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. पोलीस लाईन टाकळी येथील रहिवासी दिनेश चन्द्रिकाप्रसाद मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुभाष बंजारा याने काही महिन्यांपूर्वी कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी नागपुरात सुरु केली. सदरमध्ये या कंपनीचे ऑफिस होते. वेगवेगळ्या प्रकारची वाहने कॅब सर्व्हिसच्या नावाखाली आरोपी बंजारा याने भाड्याने घेतली. मिश्रा यांच्याकडून त्याने तीन वाहने घेतली. प्रतिमाह ३० हजार रुपये भाडे देण्याचा करारनामा केला. मात्र मिश्रा तसेच अन्य वाहन मालकांना आरोपी वंजारा आणि त्याच्या साथीदारांनी रक्कम दिली नाही. त्यांनी दिलेले धनादेशही बँकेत रक्कम नसल्यामुळे वाटत नव्हते. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाहन मालकांनी वंजाराच्या ऑफिस समोर निदर्शनेही केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकरणाची माहिती सदर पोलिसांना होती. परंतु पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक वाहन मालकाची फसवणूक करून बंजारा आणि त्याचे साथीदार पळून गेल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी मिश्रा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीTaxiटॅक्सी