शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणुकीचे रॅकेट : मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर मुलाखत अन् बोगस नियुक्तिपत्र

By योगेश पांडे | Updated: June 20, 2025 13:02 IST

फसवणुकीचे रॅकेट : मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने नागपुरातील बंटी-बबलीकडून गंडा

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुरू असलेल्या एका फसवणुकीच्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे नाव घेत उमेदवारांना गंडा घातला. आरोपींची हिंमत इतकी वाढली की त्यांनी चक्क पीडित व्यक्तींना मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेऊन तेथे एका तथाकथित अधिकाऱ्याची भेट घालून देत मुलाखतीचा फार्सदेखील पार पाडला. २०२० ते २०२२ या कालावधीत रचण्यात आलेले हे रॅकेट आता उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपींनी अनेकांना कोट्यवधींनी गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुरेश भय्यालाल धमगाये (४१, गोरेवाडा वस्ती) यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे. लॉरेन्स मारीदास हेनरी (आनंद नारायण अपार्टमेंट, मानेवाडा रिंग रोड), त्याची पत्नी शिल्पा हेनरी, विजय विनायकराव पाटणकर (कळमना मार्ग, श्रीराम चौक) व नितीन साठे अशी आरोपींची नावे आहेत. एका मित्राच्या माध्यमातून धमगाये यांची लॉरेन्ससोबत भेट झाली होती. लॉरेन्सने तो नेक्सस एच आर सोल्युशन्स ही जॉब प्लेसमेन्ट एजन्सी चालवत असल्याचे तसेच मंत्री कोट्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचे काम करत असल्याची बतावणी केली होती. सहा महिन्यांत सरकारी नोकरी लावून देण्याचे त्याने आमिष दाखविले व त्याबदल्यात १२ लाखांची मागणी केली. धमगाये यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ६.८९ लाख रुपये त्याला दिले. लॉरेन्सने मंत्रालयात नितीन साठे नावाचा सचिव दर्जाचा अधिकारी मित्र असल्याचा दावा केला. त्यानंतर मंत्रालयात मुलाखत असल्याचे सांगत धमगाये यांना मुंबईत बोलविले. आरोपीने त्यांना मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेत तेथील रेकॉर्ड रूममध्ये साठे नावाच्या तथाकथित अधिकाऱ्याशी भेट घालून दिली. साठेने तेथे त्यांची मुलाखत घेण्याचे नाटक केले. मात्र, बराच कालावधी उलटूनदेखील आरोपींनी कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यामुळे धमगाये यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. धमगाये यांना त्याने केवळ दोन लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. अखेर धमगाये यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस नियुक्तिपत्रदेखील केले तयारआरोपींनी आरोपींनी काही दिवसांत नियुक्तिपत्र मिळेल असे सांगत थमगाये यांना पैसे मागितले. आरोपींनी धमगाये यांना त्यांचे नियुक्तिपत्रदेखील दाखविले व त्यानंतर शारीरिक चाचणी द्यायची असल्याचे सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी