शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हल्दीराम कंपनीची फसवणूक : ४० लाखांच्या मालाची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 21:53 IST

सुप्रसिद्ध हल्दीराम ग्रुप ऑफ कंपनीजमधील ऑनलाईन विकलेल्या मालाची अफरातफर करून तिघांनी कंपनीला ४० लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२० कालावधीत झालेल्या या अफरातफरीची माहिती उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुप्रसिद्ध हल्दीराम ग्रुप ऑफ कंपनीजमधील ऑनलाईन विकलेल्या मालाची अफरातफर करून तिघांनी कंपनीला ४० लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२० कालावधीत झालेल्या या अफरातफरीची माहिती उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.हरीश ऊर्फ भोलू ज्ञानेश्वर गावंडे, रामकृष्ण पुनाजी पाटील आणि राजेश मदनलाल गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी हरीश गावंडे हा हल्दीराम कंपनीच्या ओम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ऑनलाईन विक्री विभागाचा व्यवस्थापक होता तर रामकृष्ण पाटील आणि राजेश गुप्ता हे दोघे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी असोसिएट आहेत. डिसेंबर २०१७ ते २८ सप्टेंबर २०२० दरम्यान हल्दीराम कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केलेला माल ग्राहकापर्यंत पोचवला. मात्र विविध कारणांमुळे ग्राहकांनी ऑर्डर रद्द केल्यानंतर परत आलेल्या मालाची कंपनीत नोंद केली नाही. हा माल परस्पर बाहेर विकून त्या मालाची रक्कम अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये आरोपी गावंडे, पाटील आणि गुप्ता त्या तिघांनी हडपली. कंपनीच्या लेखा विभागातून वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचली. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक श्रीनिवासराव सांबशिवराव विणहकोट यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमांनुसार उपलब्ध आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीhotelहॉटेल