शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य भारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील मोठे हॉटेल व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. मोहब्बतसिंग यांच्या पुतण्यानेच फसवणुकीची ही तक्रार पोलिसांत नोंदविली, हे विशेष.

अजिंदरसिंग गुरुलालसिंग तुली (वय ६०, रा. क्लॉर्क टाऊन) असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते मोहब्बतसिंग यांचे पुतणे असल्याचे समजते. त्यांनी मोहब्बतसिंग कपूरसिंग तुली यांच्यासोबत २ जुलै २०११ ला गांधीबाग ईतवारीत बॉम्बे गुडस् ट्रान्सपोर्ट गॅरेज कंपनी सुरू केली होती. भारत सरकार मंत्रालय कंपनी रजिस्ट्रर मुंबई येथील कार्यालयात ग्रेट रोडवेज प्रा. लि. कंपनीच्या नावाने नोंदणी करण्यात आली. या कंपनीत फिर्यादी अजिंदरसिंग १९९४ पासूनच कार्यरत होते. कंपनीच्या स्थापनेनंतर अजिंदरसिंग यांनी कंपनीच्या नावे ७५ टक्के शेअर्स खरेदी केले होते. कंपनीत अजिंदरसिंग यांचे वडील गुरुलालसिंग कपूरसिंग तुली (मोहब्बतसिंग यांचे बंधू ) हेसुद्धा संचालक होते. त्यांनी ग्रेट रोडवेज कंपनीच्या नावाने १७,५०० शेअर्स खरेदी केले होते. अशा प्रकारे अजिंदरसिंग आणि त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण २२, ५०० शेअर्स होते. अजिंदरसिंग यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अजिंदरसिंग यांनी घरातील कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांना स्वताच्या आणि वडिलांच्या नावे असलेल्या २२, ५०० शेअर्सबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी कंपनीत विचारपूस केली असता ते शेअर्स मोहब्बतसिंग तुली यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना कळले. याबाबत अजिंदरसिंग यांनी मोहब्बतसिंग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दाद दिली नसल्याचे समजते. कोणताही करार किंवा निर्णय झाला नसताना मोहब्बतसिंग यांनी अजिंदरसिंग यांचे शेअर्स आपल्या नावाने करून आपला विश्वासघात केल्याची भावना झाल्यामुळे अजिंदरसिंग यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रे तपासल्यानंतर तहसील पोलिसांनी सोमवारी मोहब्बतसिंग तुली यांच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

----

साथीदार कोण ?

फसवणुकीच्या या प्रकरणात पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हणून मोहब्बतसिंग यांचेच नाव दिले आहे. मात्र, कलम ३४ ही लावले आहे. त्यामुळे या फसवणुकीत मोहब्बतसिंग यांच्यासोबत आणखी आरोपी असल्याचे स्पष्ट होते. ते दुसरे आरोपी किती आणि कोण, ते मात्र पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही.

----