शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

मदत करणाऱ्यांच्या आश्रयामुळे मिळेनात कोल्हे बंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST

नागपूर : गुंतवणुकीच्या नावावर ३५ कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला सुशील कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार ...

नागपूर : गुंतवणुकीच्या नावावर ३५ कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला सुशील कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार भरत साहूचा चार महिन्यानंतरही काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्यामुळे ते हाती लागत नाहीत. त्यामुळे कोल्हे बंधूंपासून पीडित असलेले नागरिकही समोर येण्यास टाळाटाळ करीत आहेत.

कोल्हे बंधूंवर ३ टक्के मासिक व्याज आणि बोनस देण्याची बतावणी करून ३५ कोटींची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. सीताबर्डी पोलिसांनी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक शाखा करीत आहे. कोल्हे बंधूंना सुरुवातीपासूनच पोलिसांचा आश्रय मिळालेला आहे. सुशील कोल्हेने सीताबर्डी पोलिसांना विश्वासात घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याची हिंमत वाढली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या तत्परतेमुळे कोल्हे बंधूंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. कोल्हे बंधूंची सिव्हील लाईन्सच्या उत्कर्ष अलंकार अपार्टमेंटमध्ये डिजिटल अ‍ॅडव्हर्टाईझमेंट कंपनी एजीएम काॅर्पोरेशन होती. त्या माध्यमातून तो गुंतवणूकदारांना चौकात डिजिटल बोर्ड लावून मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे कंत्राट देण्याची बतावणी करीत होता. त्यांनी सुरुवातीला एजंट आणि गुंतवणूकदारांना व्याज आणि बोनस दिला. त्यानंतर गुंतवणूकदारांची रक्कम हडपणे सुरू केले. प्रकरणाच्या तपासात कोल्हे बंधूंचा उमरेड येथील साथीदार अजय लधवे यास अटक करण्यात आली. तो न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे. त्याची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. सूत्रानुसार कोल्हे बंधूंची पोलिसात चांगली ओळख आहे. त्यांनी पोलीस नाईटसह अनेकदा आर्थिक सहकार्यही केले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय पोलीस विभागाशी निगडित काही नागरिकांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोल्हे बंधूंना पकडण्यात यश आलेले नाही. कोल्हे बंधूंनी कुटुंबीयांसह अनेक नागरिकांच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे. त्यांनी छत्तीसगडमध्ये तीन एकर जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी कुटुंबीयांच्या नावे केली आहे. तसेच लधवेने आपल्या एका साथीदाराच्या नावावर अनेक प्लॉटची रजिस्ट्री केली आहे. त्याच्या साथीदाराकडे उत्पन्नाचा कोणताच पर्याय नाही. कोल्हे बंधूंच्या कार्यालयात युवतींची फौज काम करीत होती. त्या युवतीही फसवणुकीत सहभागी आहेत. एका युवतीला बैतूल पोलिसांनी अटक केली आहे. तिलाही आरोपी केल्या जाऊ शकते.

.............

तक्रारीस टाळाटाळ करीत आहेत पीडित

तपासात मंदगती असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार समोर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. आतापर्यंत चार ते पाच कोटी रुपयाच्या फसवणुकीच्या तक्रारीच मिळाल्या आहेत. परंतु शेकडो नागरिकांची फसवणूक झाली आहे. ते मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमधील रहिवासी आहेत.

............