शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चार तरुण बुडाले

By admin | Updated: September 7, 2015 02:46 IST

पिकनिकसाठी गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास कन्हान नदीच्या महादुला पुलाजवळ ही घटना घडली.

पिकनिक जीवावर बेतली : कन्हान नदीच्या महादुला पुलाजवळील घटना नागपूर : पिकनिकसाठी गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास कन्हान नदीच्या महादुला पुलाजवळ ही घटना घडली. यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.नागपूरच्या विविध भागात राहाणारे सहा तरुण मित्र रविवारी वाकी परिसरात पिकनिकला गेले होते. दुपारी ४ च्या सुमारास खाणेपिणे झाल्यानंतर हे सर्व कन्हान नदीच्या महादुला पुलाकडे गेले. पोहणे येत नसताना त्यातील एक जण पाण्यात उतरला. त्याला पाहून दुसराही पाण्यात गेला. हे दोघे काही वेळेतच गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी अन्य दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, पाणी अधिक जास्त असल्यामुळे हे चारही जण पाण्यात दिसेनासे झाले. काठावर उभे असलेल्या दोघांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. मात्र, ज्या ठिकाणी हे तरुण बुडले. त्या ठिकाणी पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे इतरांनी पाण्यात उतरण्याची हिम्मत दाखवली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पारशिवनीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी मासेमारी करणारांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मृतांची नावे पाण्यात बुडून मरण पावलेल्यांची नावे पिंटू ऊर्फ विलास धनराज धामडे (वय २५), रमेश रामराज यादव (वय २८), प्रवीण श्रीराम पंजारे (वय २७) आणि मंगेश डहाट अशी आहे. हे सर्वच्या सर्व जरीपटका ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे समजते. त्यांच्या सोबत असलेले मात्र पाण्यात न उतरल्यामुळे बचावलेल्यांची नावे दिनेश माते आणि सतीश कोटांगळे आहे. ते टेकानाका भागातील रहिवासी असल्याचे पोलीस सांगतात.