शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील चार महिलांवर भोंदू मांत्रिकाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूतबाधेचा धाक दाखवून उपचाराच्या नावाखाली एका भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलगी, तिची आई, मामी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भूतबाधेचा धाक दाखवून उपचाराच्या नावाखाली एका भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलगी, तिची आई, मामी आणि आजी अशा चाैघींवर सात महिन्यांत अनेकदा बलात्कार केला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय ५०) या मांत्रिकाला अटक केली.

आरोपी निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८ पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी कधी अंगारे, धुपारे करायचा.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या काळात (मे २०२०) पीडित मुलीची प्रकृती वारंवार बिघडू लागली. खासगी दवाखाने बंद असल्याने मेडिकल स्टोअर्समधून गोळी घेऊन तिचे कुटुंबीय तिला देत होते. मात्र, काही दिवस झाले की तिची पुन्हा प्रकृती बिघडत होती. त्यामुळे खासगी काम करणारे मुलीचे वडील अस्वस्थ होते. दरम्यान, आरोपीने एक दिवस त्यांना काय प्रॉब्लेम आहे, अशी विचारणा केली. त्याने मुलीची प्रकृती वारंवार बिघडते, असे सांगताच मांत्रिक निनावेने तिला आपल्या दरबारात आणायला सांगितले. त्यामुळे मुलीचे आईवडील तिला निनावेच्या घरी घेऊन गेले. त्याने अंगात आल्याचा बनाव करून मुलीला भयंकर भूतबाधा झाल्याचे सांगितले. मोठी पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने आपले जाळे टाकले. त्यानंतर अंगारे धुपारे, गुंगीचे औषध देऊन, रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन तो ‘विधीच्या नावाखाली’ मुलीवर बलात्कार करू लागला. तुझ्या अंगातील भूत पळवायचे आहे त्यामुळे तू कुणाला या विधीबद्दल सांगितले तर तुझ्या कुटुंबातील सर्व जणांना भूत ठार मारेल, असे सांगून त्याने मुलीला गप्प केले. हे करतानाच त्याने एक दिवस मुलीच्या आईवरही बलात्कार केला. तिलाही ठार होण्याची भीती दाखवून गप्प केले. कधी आरोपी स्वत:च्या घरी, कधी पीडितेच्या घरी तर कधी बाहेर नेऊन कुकृत्य करायचा. एक दिवस त्याने पूजेच्या नावाखालीच बाजूलाच राहणाऱ्या मुलीच्या मामीच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर मुलीच्या ६० वर्षीय आजीसोबतही त्याने तोंड काळे केले.

---

अखेर पाप उजेडात आले

डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे हे कुकर्म सुरू होते. चाैघीही लज्जेखातर एकमेकींना हा प्रकार सांगत नव्हत्या. मात्र, एक दिवस तो बलात्कार करताना दुसरीला दिसला. ते बघून त्याने आपल्यासोबतही असेच केल्याचे पीडितेला सांगितले. नंतर मामी अन् आजीसोबत चर्चा झाली असता त्याने आपल्यावरही अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या संतापाचा भडका उडला. कुटुंबातील पुरुषांसोबत चर्चा करून पीडितांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात पीडित परिवाराने पारडी ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीला अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळवली. सोमवारी त्याची कोठडी संपणार असून, पुन्हा पोलीस ती वाढवून घेणार आहेत. विशेष म्हणजे आरोपीला अटक करून आठ दिवस होऊनही पारडी पोलिसांनी या संतापजनक प्रकरणाचे वृत्त बाहेर कळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.

----

बाहेरगावीही नेऊन केला अत्याचार

नराधम निनावेने पीडित मायलेकीला डोंगरगड आणि चंद्रपुरात पूजेसाठी नेले. तेथे खोली घेऊन त्याने दोघींवरही अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याने आपल्या घरातच दरबार थाटल्याचे दिसून आले. देव अंगात येतो असे सांगून तो मांत्रिकाची वेशभूषा करतो आणि पीडितांना गंडे-दोरे देऊन त्यांच्याकडून रक्कम उकळतो, असेही स्पष्ट झाले आहे. त्याने अशाच प्रकारे अन्य महिला-मुलींवर बलात्कार केला असावा, असा संशय आहे.

---