शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

चार अल्पवयीन मुलींची सुटका

By admin | Updated: July 2, 2014 00:55 IST

गंगा जमुना परिसरात २० ते २५ अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करवून घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता धाड टाकली.

नागपूर : गंगा जमुना परिसरात २० ते २५ अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करवून घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता धाड टाकली. धाडीत चार अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांना देहविक्रीस भाग पाडणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. धाडीनंतर एकच धावपळ झाल्याने या भागातील अनेक अल्पवयीन मुली पळून गेल्या.गंगा जमुनात २० ते २५ अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करवून घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला पुण्यातील फ्रिडम फर्म संस्थेचे सत्यजीत देसाई, सुरेंद्र सहारे, एंजला एलीस एरम तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुपमा मिश्रा यांनी दिली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी आपल्या ताफ्यासह गंगा जमुनात धाड टाकली. धाडीत आरोपी जनताबाई ऊर्फ गीता गिराजतेली कर्मावत (५०) हिला चार अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करवून घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. धाडीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यात देहविक्री करणाऱ्या अनेक अल्पवयीन मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या. सामाजिक सुरक्षा विभागाने आरोपी जनताबाई उर्फ गीता गिराजतेली कर्मावत विरुद्ध पीटा अ‍ॅक्टनुसार कारवाई केली. त्यानंतर धाडीतआढळलेल्या चारही अल्पवयीन मुलींची सिव्हिल लाईन्सच्या करुणा सुधारगृहात रवानगी करण्यात आली. संदीपसिंग महेशसिंग बैस (३४) रा. भैरीगंज, सिवनी आणि राहुल रमेश लष्करे (२५) रा. खापा ता. सावनेर या दोन ग्राहकांवरही कारवाई करण्यातआली. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार, सहायक पोलीस निरीक्षक एम. बी. बारापात्रे, एस. एम. पाटील, अमिता जयपूरकर, पांडुरंग निकरे, प्रकाश सिडाम, कमलाकर पाटील, संजय तेलमासरे, गोपाल वैद्य, अजय घाटोड, राजू रोकडे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)