सावनेर : चाेरट्याने घरात प्रवेश करून साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना सावनेर शहरातील धनगरपुरा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
विवेक पुंडलिकराव ढवळे (रा. धनगरपुरा, सावनेर) हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. बंद घर फोडून चाेरट्याने आत प्रवेश केला आणि घरातील साहित्य चाेरून नेले. त्यांचे भाऊ डाॅ. रवि ढवळे (रा. नाईक लेआऊट, सावनेर) यांच्या घरी गेले असता, त्यांना घराचे दार उघडे दिसले. घराच्या तपासणीदरम्यान, चाेरट्याने कपाटातील ४० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने, १० हजार रुपयांचे चांदीचे नाणे व वस्तू, तीन हजार रुपयांचे घड्याळ व ३० हजार रुपये राेख असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज चाेरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी डाॅ. रवि ढवळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार बाेरकर करीत आहेत.