शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कापसीत चार आरामशीनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:51 IST

भंडारा रोड, कापसी खुर्द येथील चार आरामशीनला शनिवार रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आरा मशीन्ससह कोट्यवधी रुपयांचा सागवान जळून खाक झाले.

ठळक मुद्देकोट्यवधींचे सागवान खाक : नेमक्या कारणाचा खुलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा रोड, कापसी खुर्द येथील चार आरामशीनला शनिवार रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आरा मशीन्ससह कोट्यवधी रुपयांचा सागवान जळून खाक झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.आरामशीनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड असल्यामुळे आगीचे लोण चांगलेच पसरले. शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कळमना, लकडगंज, गणेशपेठ, सिव्हिल लाईन्स, सुगतनगर येथील अग्निशमन केंद्रावरील १० गाड्या आग विझविण्यासाठी लागल्या होत्या. अग्निशमन विभागातील सूत्रानुसार योगेश पटेल यांच्या सारंग टिंबर ट्रेडिंग कंपनीच्या चार मशीन व सागवान जळाल्यामुळे सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच अश्विन मदनलाल पटेल यांच्या मे. सिद्धी विनायक टिंबर मार्टमधील पाच मशीन व सागवान जळाल्याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. भगवान हिवराज पटेल यांच्या मे. रत्नानी टिंबर कंपनीचे ६० लाख रुपयांचे व हेमंत शांतिलाल पटेल यांच्या मे. शांतिलाल मनी पटेल अ‍ॅण्ड कंपनीचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले.दिवाळीमुळे आरा मशीनवरील कामगार सुटीवर गेले होते. त्यामुळे मशीन सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे सिंगल फेज लाईनमध्ये शार्ट सर्किट होण्याची शक्यता कमी आहे. आग लागण्याचे इतर कोणते कारण असू शकते हे कळलेले नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम सिद्धी विनायक टिंबरकडे आगीच्या ज्वाला दिसल्या. यानंतर आग वेगाने सारंग टिंबर व अन्य आरामशीनमध्ये पसरली. चौकीदारांनी मालकांना आग लागल्याचे कळविले. यानंतर त्वरित अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. अग्निाशमन अधिकारी मोहन गुडधे यांच्या नेतृृत्वात पथकाने सकाळी ७ पर्यंत आग नियंत्रणात आणली. यानंतर शेजारच्या आरामशीनमधील लाकडे जेसीबीच्या साहाय्याने दूर सारण्यात आली. मात्र, आग विझल्यानंतरही धूर निघणे सुरूच होते. त्यामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी तैनात ठेवण्यात आले होते.